-->

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष  डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष

डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम


 

जन्मु द्या त्या चिमुकलीला सार्थक या जन्माचे होईल पहाल तुम्ही, हिच चिमुरडी एक दिवस आकाशी भरारी घेईल


वाशिम, 

"समाजातील स्त्रियांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात, त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, तसेच मुलींच्या शिक्षण आणि सशक्तीकरणाला चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी २४ जानेवारीला 'राष्ट्रीय बालिका दिवस' साजरा केला जातो. २००८ साली सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जात आहे." तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा १० वर्धापन दिन भारतीय डाक विभाग साजरा करत आहे.

       पोस्टल विभाग मुलींचे भविष्य उज्वल, सक्षम करण्याची संधी देत आहे. व सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे जी केवळ मुलींसाठी आहे. "बेटी बचाओ बेटी पढाओ” चा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे.

       मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी तसेच महिला सशक्तीकरन उद्देश्य प्राप्ती साठी भारत सरकारने हि योजना अंगिकारली आहे... तरी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी, राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, आपल्या १० वर्षाखालील मुलीचे आजच आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधूया... *मुलीच्या उज्वल भविष्याची कास धरूया*....


सुकन्या समृद्धी खाते योजनाची मुख्य वैशिष्ट्ये

• वयोमर्यादा ० ते १९ वर्षाच्या आतील मुलीसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या खाते किमान २५० रुपयांमध्ये उघडता येते.

सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्ष पैसे भरावे लागतात.

 सुकन्या समृद्धी हे खाते उघडल्यापासून २१ वर्षापर्यंत खात्याची मुद्दत राहील.

 मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न झाल्यास एसएसवाय खाते मुदतपूर्व बंद करता येईल.

 सुकन्या खात्यामध्ये कमीत कमी वार्षिक २५० रुपये व जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणुक

करता येईल.

 खाते काढण्यासाठी ग्रामपंचायत/नगर/महानगर पालिका यांनी जरी केलेले मुलीचे जन्म प्रमाणपत्र

आवश्यक आहे.

Related Posts

0 Response to "राष्ट्रीय बालिका दिवस विशेष डाक विभागाची 'सुकन्या समृद्धी खाते' मोहीम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article