
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा माता पालक मेळाव्याचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा माता पालक मेळाव्याचे आयोजन
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे सांक्रुतीक विभागाचे वतीने माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले असता अध्यक्ष स्थानी शाळेच्या संचालिका प्रमिलाताई भगत यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर अध्यक्षीय भाषणात बोलत असताना माता पालकांचा सहभाग आपल्या पाल्याच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगती मध्ये मोलाचा वाटा आहे तेंव्हा आपला पाल्याचे शैक्षणिक क्षेत्रात कशी प्रगती होत आहे त्यासाठी आपण वेळो वेळी शाळेच्या शिक्षकांशी सुसंवाद, हितगुज करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले आपला पाल्य आईशी जेवढा मोकळा संवाद साधून सांगु शकतो तेवढा बाबा सोबत नाही म्हणुन माता पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी यांच्या माता बहुसंख्येने उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शाळेच्या शिक्षिका सरोज देशमुख,वैशाली चातुरकर,सविता भालेराव, ज्योती इंगोले, किशोरी भगत, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयश्री सरनाईक यांनी व आभार प्रदरशन तेजस्विनी इंगळे यांनी केले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा माता पालक मेळाव्याचे आयोजन "
Post a Comment