
गळा दाबुन खुन केला यावरुन अनिकेतचा खुन झाल्याचे उघड झाले. आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातुन व विकृत मनोवृत्तीतुन खुन
साप्ताहिक सागर आदित्य
पोलीस स्टेशन अनसिंग हददीतील ग्राम बाभुळगांव येथील संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तकार दिली की त्यांचा मुलगा नामे अनिकेत संतोष सादुडे वय 14 वर्ष रा बाभुळगांव हा गावातील लग्नाचे मिरवणुकीत नाचायला गेला होता. रात्रीचे दोन वाजल्यानंतरही तो घरी न परतल्याने वडील संतोष सादुडे यांनी त्याचा गावात शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्याचवेळी संतोष सादुडे यांना त्यांचे घराजवळ एक पाच पानाचे पत्र मिळुन आले. त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असुन 60 लाखाची मागणी केली होती. मागणी पुर्ण न केल्यास अनिकेतला जीवे मारण्याबाबत धमकी दिली होती.
संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तकार दिल्यानंतर गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी 18 अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथके तयार केली. सर्व दिशांनी तपास सुरू करण्यात आला. सर्वत्र अनिकेतचा शोध घेण्यात आला. सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी तांत्रिक बाबींवर अहोरात्र तपास केला.
तपासदरम्यान प्रणय पदमणे, शुभम इंगळे यांचेवर पहील्या दिवसापासुनच संशय असल्याने त्यांचेवर विशेष लक्ष देवुन सखोल चौकशी करण्यात आली त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार केलेल्या चौकशी वरून त्यांच्या जबाब, हालचाली, कृती मध्ये प्रत्येक वेळेस येत असलेल्या विसंगतीमुळे त्यासर्व जबाबांचा निष्कर्ष काढुन अंत्यत बारकाईने व तांत्रीक विश्लेषन करुन चौथ्यांदा विचारपुस केली असता प्रणय पदमणे याने गुन्हयाची कबुली दिली की, दिनांक 12.03. 2025 रोजीचे रात्री 12.00 वा दरम्यान अनिकेत संतोष सादुडे वय 14 वर्ष याला शुभम इंगळे याचे मदतीने मिरवणुकीमधुन आमीष दाखवुन बाभुळगांव ते बाभुळगांव फाटा शेतशिवारात नेले त्याचा दिनांक 13.03.2025 रोजीचे 00.45 वा दरम्यान गळा दाबुन खुन केला यावरुन अनिकेतचा खुन झाल्याचे उघड झाले. आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातुन व विकृत मनोवृत्तीतुन खुन करण्याच्या उददेशाने केले पण आपले कृत्य उघउ होवु नये पोलीसांची तपासाची दिशा भटकावी सर्वत्र संभ्रम निर्माण व्हावा यासाठी किडनॅपींग व खंडणी मागणीचा चिठठी टाकुन बनाव तयार केला. तपासादरम्यान अनिकेत सादुडे याचे प्रेत ताब्यात घेण्यात आले.
सखोल तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांचे आधारे सदर गुन्हा उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची घटना वाशिम जिल्हयातील पहिलीच घटना असल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते.
पोलीस अधीक्षक यांचे आवाहन
या घटने संदर्भाने सर्व जनता, तरुणांना आवाहन आहे की, आपण कोणतेही अनुचीत, बेकायदेशीर कामे, गैरकृत्य करु नका. आज ना उद्या तुमचे कृत्य उघड पडणारच आहेत.
सदर गुन्हयाचा तपास अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम, नवदीप अग्रवाल, सहा.पो.अधिक्षक, मा. श्रीमती निलीमा आरज, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपिर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थागुशा, प्रदिप परदेसी, अमर चोरे, प्रविण धुमाळ, राजेश खेरडे, देवेंद्रसिंह ठाकुर, सुधाकर आडे, रामेश्वर चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे, भारत लसंते, अमोल पुरी, राहुल शेजव, श्रीदेवी पाटील, योगेश धोत्रे, त्रंबक गायकवाड, संतोष आघाव, पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी, निलेश जाधव, रामविजय राजपुत, ज्ञानेश्वर धावडे, प्रदिप घटे, स्वाती इथापे, राहुल गंधे, मारोती वंजारे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, पोलीस स्टेशन अनसिंग, वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, यवतमाळ, अमरावती व बुलढाणा सायबर टिम व अकोला स्थानिक गुन्हे शाखेची टिम चे अंमलदार यांनी केला आहे. पुढील तपास पोनि अमर चोरे, पोलीस स्टेशन अनसिंग हे करीत आहेत.
१,३२५
(रामकृष्ण महल्ले) स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम
0 Response to "गळा दाबुन खुन केला यावरुन अनिकेतचा खुन झाल्याचे उघड झाले. आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातुन व विकृत मनोवृत्तीतुन खुन"
Post a Comment