-->

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला वाशिम शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा कार्यशाळेकरिता मोठा सहभाग

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला वाशिम शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा कार्यशाळेकरिता मोठा सहभाग

 


साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला वाशिम शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा कार्यशाळेकरिता मोठा सहभाग


हॉटेल इव्हेंटो येथे CME कार्यक्रम संपन्न "जिल्हा क्षयरोग विभागाचे आयोजन" 


वाशिम : दि.२० ,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्या मध्ये चालु असलेल्या 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. या करिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) व आय.ए.पि.  व  निमा (NIMA) वाशिम यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, मुख्य मार्गदर्शक जागतिक आरोग्य संघटनेचे सालागार डॉ. सम्यक खैरे प्रमूख पाहुणे आय.एम.ए चे अध्यक्ष  डॉ संतोष सारडा, सचिव डॉ. नेनवानी मॅडम, निमा चे अध्यक्ष डॉ. डाखोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रेश्मा पाटील मॅडम, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पूरी सर, जिल्हा क्षयरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.श्री.परभणकर, डॉ.चाफे,  श्री चव्हाण व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) व आय.ए.पि.  व  निमा (NIMA) वाशिम  चे सर्व सदस्य उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य दैवत धन्वंतरी व डॉक्टर रॉबर्ट  कॉच यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. डॉ. अनिल कवारखे यांनी टीबी मुक्त भारत अभियान मध्ये खाजगी डॉक्टर यांचे मोठें योगदान टी बी मुक्त लढ्या मध्ये लाभले. 

डॉ. ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना आवाहन केले आहे. की भारत हा 2025 पर्यंत टी.बी मुक्त झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी एक संकल्प केला आहे. या संकल्पना साठी सर्वांचे योगदान हे महत्त्वाचा आहे. आपण सर्व खाजगी वैद्यकीय सेवेतून देखील या अभियानाला आपले योगदान देऊन सहकार्य करणे हे देशाच्या विकासाला साथ आहे. 

डॉ.परभणर यांनी कुष्ठरोग मुक्त भारत अभियान बाबत मार्गदर्शन करून पेशंट संदर्भात येणाऱ्या अडचणी समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन करून खाजगी डॉक्टर यांच्याकडे येणारे TB  संशयित  व कुष्ठरोग पेशंट यांचे उपचार समुपदेशन करून टीबी आजार हा उपचार पूर्ण केल्यास बरा होतो. हे आपण लक्षात आणून देणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन यावेळी केले.

डॉ. सम्यक खैरे यांनी टीबी बाबत व टीबी मधील साय टीबी चाचणी निक्षय मित्र अभियान टीपीटी निकपोषण मार्गदर्शन केले.  

या  कार्यक्रमाला उपस्थित  जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने,अशोक भगत,जयकुमार सोनुने,रामदास गवई, अमोल शिंदे,  मंगेश पिंपरकर,विकास देशमुख,  यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  समाधान लुनसुने यांनी  केले. प्रास्ताविक डॉ.सतीश परभणकर यांनी केले. सर्वांचे आभार डीगांबर महाजन यानी मनाले,संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन जयकुमार सोनुने, डिगांबर महाजन,  नौशाद खान, प्रतीक कुटे यांनी केले.

Related Posts

0 Response to "राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला वाशिम शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा कार्यशाळेकरिता मोठा सहभाग"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article