
वाशिम जिल्ह्यात ‘घर पोहोच दाखले’ मोहीम 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात ‘घर पोहोच दाखले’ मोहीम
1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025
ग्रामीण नागरिकांना अत्यावश्यक दाखले सहज व विनासायास उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘घर पोहोच दाखले’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत ग्रामपंचायत अधिकारी गावातील प्रत्येक घरास भेट देऊन नागरिकांना आवश्यक दाखले थेट त्यांच्या दारात उपलब्ध करून देतील. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
मोहीम अंतर्गत देण्यात येणारे दाखले:
ग्रामपंचायतमार्फत खालील दाखले घरपोच दिले जाणार आहेत:
✔ जन्म नोंद दाखला
✔ मृत्यू नोंद दाखला
✔ विवाह नोंद दाखला
✔ दारिद्र्य रेषेखालील दाखला
✔ हयातीचा दाखला
✔ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
✔ शौचालयाचा दाखला
✔ नमुना आठ उतारा
✔ निराधार असल्याचा दाखला
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून थेट आढावा:
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला वेळेत आवश्यक दाखले मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामीण नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा:
ग्रामीण भागातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे घर कर व पाणी कर भरून सहकार्य करावे असेही आवाहन सीईओ वैभव वाघमारे यांनी केले आहे.
0 Response to "वाशिम जिल्ह्यात ‘घर पोहोच दाखले’ मोहीम 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025"
Post a Comment