-->

"विश्वशांती पदयात्रेचे वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत, रस्ता सुरक्षेचा संदेश देत यवतमाळकडे मार्गक्रमण"

"विश्वशांती पदयात्रेचे वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत, रस्ता सुरक्षेचा संदेश देत यवतमाळकडे मार्गक्रमण"



 साप्ताहिक सागर आदित्य 

"विश्वशांती पदयात्रेचे वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत, रस्ता सुरक्षेचा संदेश देत यवतमाळकडे मार्गक्रमण"


वाशिम,दि.६ फेब्रुवारी (जिमाका) जगातील सर्वात मोठ्या पायी प्रवासाच्या मोहिमेअंतर्गत डेंजर अॅडव्हेंचर्स अंतरवेद स्पोर्ट्स विश्वशांती पदयात्रेचा वाशीममध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गिनीज बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सधारक अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेने आतापर्यंत ४ लक्ष ५० हजार किमीचा प्रवास करत ११ देशांचा दौरा पूर्ण केला आहे.


रस्ता सुरक्षेसाठी जनजागृती:

ही यात्रा केवळ प्रवासापुरती मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन, रस्ता सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण, जलसंवर्धन, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती करत आहे. वाशिममध्ये पुसद नाका, अकोला नाका आणि शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी या समूहाने दुचाकीस्वारांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे दिले.


यावेळी वाहनचालकांना पुष्पहार घालून स्वागत करत एका वेगळ्या पद्धतीने संदेश देण्यात आला. "गाडी व्यवस्थित चालवा, अन्यथा हे हार तुमच्या फोटोवर येऊ शकते!" असा समज देत वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला.


जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची सदिच्छा भेट:

आज सकाळी या समूहाने वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची भेट घेतली आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी माहिती दिली. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वनसंवर्धन, रस्ता सुरक्षा आणि जलसंधारण या विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी  एस यांनी या मोहिमेचे कौतुक करत संघाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.


आता यात्रेचे यवतमाळच्या दिशेने मार्गक्रमण:


महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १८ जिल्ह्यांमध्ये ही पदयात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे. वाशिममधील जनजागृती अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ही यात्रा आता पुढील प्रवासासाठी यवतमाळ जिल्ह्याकडे प्रयाण करत आहे.


या यात्रेच्या माध्यमातून देशभरातील ६०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी आतापर्यंत १४ कोटी ५० लाख वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही यात्रा केवळ भारतापुरती मर्यादित नसून जगभरातील ११ देशांचा प्रवास पूर्ण करून जागतिक स्तरावर शाश्वत विकासासाठी जनजागृती करत आहे.

Related Posts

0 Response to ""विश्वशांती पदयात्रेचे वाशिममध्ये उत्स्फूर्त स्वागत, रस्ता सुरक्षेचा संदेश देत यवतमाळकडे मार्गक्रमण""

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article