
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप..,.
साप्ताहिक सागर आदित्य
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप..,.
रिसोड तालुक्यातील एकमेव भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या इयत्ता बारावी कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखेच्या विद्यार्थिनींना दिनांक 5 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्या मंजुषा सु .देशमुख मॅडम होत्या. तर प्रमुख उपस्थिती बारावी कलेचे वर्गशिक्षक प्रा. शाम चौमवाल, वाणिज्य चे वर्गशिक्षक प्रा. पंजाब पानझाडे, व बारावी विज्ञान च्या वर्गशिक्षिका प्राध्यापिका विजया कौटकर, परीक्षा प्रमुख प्रा. गोपाल वाझुकर, व माजी नगराध्यक्ष प्राध्यापिका विजयमाला आसनकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः प्रतिभा पूजन करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनीनि आपले मनोगत व्यक्त केले .त्यामध्ये इयत्ता अकरावी विज्ञान च्या विद्यार्थिनी सृष्टी सरकटे, अंकिता सरकटे, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कांचन झरे, अश्विनी नवघरे, सानिका लांबाडे, पुनम खोसरे, निकिता दळवी, श्वेता ढेंबरे,आरती डिडरकर , कमल नवघरे, जान्हंवी इरतकर आणि प्रिया इरतकर या विद्यार्थिनीनी मनोगतातून कॉलेज विषयी व शिक्षक शिक्षके विषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच गीतामधून सफा खान पठाण व सलोनी गायकवाड आपल्या भावना व्यक्त केला.वर्गशिक्षक प्रा. पंजाब पानझाडे , प्राध्यापिका विजया कौटकर ,प्रा. गोपाल वाझुळकर , प्रा.अभिषेक टीकाईत प्रा.पी. एच .मोरे प्रा.गुलाब साबळे , प्रा. ज्ञानेश्वर भुतेकर या सर्वांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्षीय मार्गदर्शनातून आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी विद्यार्थिनींनी परीक्षेला सामोरे जात असताना आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे व परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी कशे यशस्वी व्हायचे असा मुलमंत्र आपल्या मनोगतातून दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती दिपक साळवे यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन किरण कैलास पवार व सहनिवेदिका पुनम गणेश भांदुर्गे यांनी केले तर आभार प्रदर्शन वेदिका सुभाष गोंधळे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता इयत्ताअकरावीच्या विद्यार्थिनी , शिक्षक शिक्षिका प्रा.दिपिका पुंड, प्रा.साधना बोरकर,प्रा वृषाली कल्याणकर.शिक्षकेतर कर्मचारी रविभाऊ कुत्तरमारे ,सोमेश्वर मखमले ,संदीप कष्टे व विजय देशमुख यांनी परिश्रम घेतले. शेवटी स्वादिष्ट अशा स्नेहभोजनाने या निरोप समारंभाची सांगता करण्यात आली.
0 Response to "भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप..,. "
Post a Comment