
उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपकाळे आणि साहू यांना निरोप
साप्ताहिक सागर आदित्य
उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपकाळे आणि साहू यांना निरोप
वाशिम
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे आणि जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहु हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले असल्यामुळे नुकतेच त्यांना निरोप देण्यात आला. जि. प. च्या वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी सीईओ वाघमारे यांच्या हस्ते यशवंत सपकाळे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला तसेच प्रकल्प संचालक साहू यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, अकोला जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणविर, कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर, गट विकास अधिकारी उदय जाधव आणि सौ. सपकाळे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेले उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे आणि साहू यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सपकाळे आणि साहू यांनी सत्काराला उत्तर देतांना आपल्या भावनांना वाट करुन दिली. सीईओ वाघमारे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.
0 Response to "उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपकाळे आणि साहू यांना निरोप"
Post a Comment