
निंभोरे (फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा भूमी बांधण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
निंभोरे (फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा भूमी बांधण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हा महाराष्ट्रातील काही माननीय पँथरांनी मुंबईवरून माघारी जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आपापल्या बरोबर घेऊन गेले. ती ठिकाणी म्हणजे अमरावती, हातकलंगले, मुंबई, लातूर, सोलापूर तसेच निंभोरे (फलटण, जिल्हा सातारा) इत्यादीत... ठिकाणी या अस्थिकलशांची स्थापना त्या त्या ठिकाणच्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केली होती. त्यातील एक म्हणजेच निंभोरे गावचे भीमसैनिक होय. या ठिकाणी कमी जागेत बारीक असे समाज मंदिरात अस्थी कलशाची स्थापना केलेली आहे. वाढलेली लोकसंख्या व जागेची कमी यामुळे हजारोंच्या संख्येने येणारे भीमसैनिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अनुयायी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नाही तसेच गाड्या पार्किंग साठी जागा नसल्याने भीम अनुयायांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. म्हणून वरील सर्व मान्यवरांना विनंती की, निंभोरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणे म्हणजेच आपल्या फलटण तसेच सातारा जिल्ह्याचे भाग्यच होय. त्यामुळे येत्या 3 मार्चच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात निंभोरे (फलटण) या ठिकाणी किमान 2 ते 10 एकर जमीन सरकारने संपादित करावी. त्या ठिकाणी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भव्य दिव्य स्मारक व अस्थी कलश स्थापन करण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनपट सांगणारे थ्रीडी कलाकृती, प्रोजेक्टर द्वारे माहितीपट, संग्रहालय, मोठे ग्रंथालय, मोठा सभा मंडप, स्वच्छ पिण्याचे पाणी, पार्किंग,... इत्यादी सोयी युक्त मोठी इमारत जुन्या या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबद्दल प्रेरणा घेऊन जाईल अशी प्रेरणाभूमी उभी* (पर्यटन स्थळ) करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील चारही माननीय कॅबिनेट मंत्री साहेबांनी व सातारा जिल्ह्यातील मा. आमदार साहेबांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना, तारांकित किंवा अतारांकित प्रश्न उपस्थित करून भरघोस निधींची तरतूद करण्यास भाग पाडावे. केल्या मंजूर निधीतून तात्काळ निंभोरे (फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. सोबत सहकारी अमर खंदारे, श्रीकांत गावडे व किरण.
0 Response to "निंभोरे (फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणा भूमी बांधण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे."
Post a Comment