-->

डॉ. विजय कानडे  यांना  कार्यगौरव पुरस्कार

डॉ. विजय कानडे यांना कार्यगौरव पुरस्कार



साप्ताहिक सागर आदित्य 

 डॉ. विजय कानडे  यांना  कार्यगौरव पुरस्कार

 वाशीम येथून जवळच असलेल्या स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,कोकलगाव च्या वतीने डॉ.विजयराव कानडे  नुकतेच कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.आहे.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन,संस्थेचे संस्थापक स्मृतीशेष कर्मयोगी प्रल्हादराव काळबांडे आणि ग्रामगीता राष्ट्रीय प्रचारक स्मृतीशेष डॉ उद्धवराव गाडेकर दादा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात पोलिस प्रशासन शिक्षण आरोग्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

 डॉ.विजयराव कानडे वैद्यकीय,शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण काळबांडे यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Posts

0 Response to "डॉ. विजय कानडे यांना कार्यगौरव पुरस्कार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article