
युवा मतदार लोकशाहीचा आधार महाजन (उप-जिल्हाधिकारी,
साप्ताहिक सागर आदित्य
युवा मतदार लोकशाहीचा आधार
महाजन (उप-जिल्हाधिकारी,
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिम येथे दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व श्री तुळशीरामजी जाधव कला विज्ञान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व एन.एस.एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय मतदार जनजागृती व युवा मतदार नोंदणी अभियान'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी वाशिमचे उपजिल्हाधिकारी महाजन सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. मा. श्री. महाजन ( उप जिल्हाधिकारी वाशिम ) यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी विषयी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी तसेच युवा मतदार हा लोकशाहीचा आधार आहे असे सांगत भारतीय लोकशाहीला अधिक सक्षम करण्याकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे देखील म्हटले, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.तायडे हे होते. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही आहे आणि भारतात युवा वर्गाची संख्या जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.डी.एम. ढवारे यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना इथपासून ते भारताच्या निवडणूक प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगत मतदारांची भूमिका आणि लोकशाही याबद्दल मार्गदर्शन करत कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.डी.एम. ढवारे (राज्यशास्त्र विभाग) व प्रा. आर. व्ही. रुक्के ( रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी ) यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचलन कु. भारती डोंगरदिवे या विद्यर्थिनीने केले तर आभार कु. दिव्या गोरे हिने मानले. तसेच कार्यक्रमाला प्रा.डॉ.विजय जाधव, प्रा.कु.सुनिता अवचार, अतुल देशमुख यांची उपस्थिती होती, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "युवा मतदार लोकशाहीचा आधार महाजन (उप-जिल्हाधिकारी, "
Post a Comment