
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२३ अभियानात सर्व गावांनी सक्रिय सहभागी घ्यावा! मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२३
अभियानात सर्व गावांनी सक्रिय सहभागी घ्यावा!
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन
वाशिम, दि 8 डिसेंबर
केंद्र शासनामार्फत दि. २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले.
लोकसहभाग वाढविणे, गावांगावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे, गावांचा सहभाग वाढविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. दोन टप्प्यांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींचे स्वयंमूल्यांकन व पुनर्पडताळणी आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय कामाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. दि. १५ डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायतींनी प्रथम स्वयं मूल्यांकन व पूर्व पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम पंचायत मार्फत ई- ग्रामस्वराज मार्फत आॅनलाईन माहिती भरुन स्वयंमूल्यांकन करायचे आहे. ग्रामपंचायतींने अंतिम स्वयंमूल्यमापन दि. ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावयाचे आहे.
जिल्हा स्तरावरील ग्रामपंचायतींची निवड करून दि. ३१ जुलैपर्यंत पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्य स्तरावरील ग्रामपंचायतींची निवड करून दि. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्याद्वारे नामनिर्देशित ग्रामपंचायतींची राष्ट्रीय एजन्सीद्वारे दि. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत स्वतंत्र पडताळणी करण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे वितरण होणार आहे.
स्वच्छ भारत मीशन ला गांभिर्याने घ्या: गटविकास अधिकार्यांना सीईओ यांचे निर्देश:
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व इतर महत्वाच्या विषयासंदर्भात सह तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन सुचना दिल्या. स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाला गांभीर्याने घ्या या भाषेत त्यांनी बीडीओ यांना निर्देश दिले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्राथमिक माहिती ही ग्राम पंचायत स्तरावरुन भरावयाची असल्याने ग्राम पंचायत आॅपरेटर यांना तालूकास्तरावर बोलवुन गावाची स्वयं मुल्यांकनाबाबतची माहिती भरुन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे संचालक किरण कोवे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगांबर लोखंडे व सर्व गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
0 Response to "स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२३ अभियानात सर्व गावांनी सक्रिय सहभागी घ्यावा! मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन"
Post a Comment