-->

ग्रा.पं.स्तरावर 6 लक्ष 83 हजार मजूर क्षमतेची  3 हजार 33 कामे शेल्फवर  मजूरांनी काम मागणीसाठी अर्ज करावे

ग्रा.पं.स्तरावर 6 लक्ष 83 हजार मजूर क्षमतेची 3 हजार 33 कामे शेल्फवर मजूरांनी काम मागणीसाठी अर्ज करावे



 साप्ताहिक सागर आदित्य 

ग्रा.पं.स्तरावर 6 लक्ष 83 हजार मजूर क्षमतेची

3 हजार 33 कामे शेल्फवर

मजूरांनी काम मागणीसाठी अर्ज करावे

       वाशिम,  : जास्तीत जास्त मजुरांना जिल्हयात रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हयात ग्रामपंचायत क्षेत्रातील वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची कामे सन २०२२-२३ या वर्षामध्ये 6 लक्ष 83 हजार 126 मजूर क्षमतेची ३ हजार ३३ कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहे.

           कारंजा तालुक्यातील 892 कामे ग्रामपंचायतस्तरावर 91 कामे यंत्रणास्तरावर अशी एकूण 983 कामे शेल्फवर आहे. या कामामध्ये ग्रामपंचायतस्तरावर 25 हजार आणि यंत्रणास्तरावर 6 हजार 350 असे एकूण 31 हजार 350 कामे मजूर क्षमतेची आहे. मालेगाव तालुक्यातील 107 कामे ग्रामपंचायस्तरावर 49 यंत्रणास्तरावर अशी एकूण 156 कामे शेल्फवर असून ग्रामपंचायतस्तरावर 9 हजार 630 यंत्रणास्तरावर 1 लक्ष 7 हजार 668 अशी एकूण 1 लक्ष 17 हजार 298 मजूर क्षमता आहे.

           मंगरुळपीर तालुक्यात 361 कामे ग्रामपंचायतस्तरावर आणि 133 कामे यंत्रणास्तरावर अशी एकूण 494 शेल्फवर आहे. यामधून ग्रामपंचायतस्तरावर 1 लक्ष 26 हजार 761 आणि यंत्रणास्तरावर 89 हजार 761 असे एकूण 2 लक्ष 16 हजार 422 मजूर क्षमता या कामांची आहे. मानोरा तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर 4 आणि यंत्रणास्तरावर 142 अशी एकूण 146 कामे शेल्फवर आहे. ग्रामपंचायतस्तरावर 1595 आणि यंत्रणास्तरावर 94 हजार अशी एकूण 95 हजार 595 मजूर क्षमतेची ही कामे आहे.

          रिसोड तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर 176 कामे आणि यंत्रणास्तरावर 163 कामे अशी एकूण 339 कामे शेल्फवर आहे. यामधून ग्रामपंचायतस्तरावर 15 हजार 750 आणि यंत्रणास्तरावर 1 लक्ष 6 हजार 731 असे एकूण 1 लक्ष 22 हजार 481 मजूरांना या कामातून रोजगार उपलब्ध होणार आहे. वाशिम तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर 857 कामे आणि यंत्रणास्तरावर 58 कामे असे एकूण 915 कामे शेल्फवर आहे. या तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावरुन 74 हजार 226 आणि यंत्रणास्तरावर 25 हजार 754 असे एकूण 99 हजार 980 मजूर क्षमतेची ही कामे आहेत.

        जिल्हयातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गावातील अकुशल काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांच्याकडून काम मागणी अर्जाचे नमुने घेऊन वैयक्तिक किंवा सामुहिक काम मागणी अर्ज नमुना क्र. ४ मध्ये जॉबकार्ड क्रमांक व कामाचा कालावधी नमूद करून स्वाक्षरी करावी. सोबत आधारकार्ड व आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या बँक पासबुकची छायांकीत प्रत अर्जासोबत देणे आवश्यक राहील. काम मागणीचा हा अर्ज ग्रामपंचायतीकडे देण्यात येऊन त्याची दिनांकीत पोच ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावी. ग्रामसेवकाकडून काम मागणी अर्जाची पोच मिळाली नसल्यास मजुरांनी पंचायत समिती/ तहसिलस्तरावरील कक्षाकडे तक्रार करावी. काम मागणी केलेल्या मजुरांना १५ दिवसाच्या आत काम उपलब्ध करून देण्यात येईल. या कालावधीमध्ये काम उपलब्ध करून न दिल्यास संबधित मजुरांना बेरोजगार भत्ता देण्यात येईल. तरी अकुशल काम करणाऱ्या व्यक्तींनी ग्रामपंचायतस्तरावर काम मागणीसाठी अर्ज सादर करावे. असे उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम यांनी कळविले आहे


                             

Related Posts

0 Response to "ग्रा.पं.स्तरावर 6 लक्ष 83 हजार मजूर क्षमतेची 3 हजार 33 कामे शेल्फवर मजूरांनी काम मागणीसाठी अर्ज करावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article