-->

रंजल्या, गांजल्याच्या सेवेत देव जानावा   डॉ. अभय पाटील; सोमठाणा डिजीटल शाळेत स्नेहमिलन कार्यक्रम

रंजल्या, गांजल्याच्या सेवेत देव जानावा डॉ. अभय पाटील; सोमठाणा डिजीटल शाळेत स्नेहमिलन कार्यक्रम



साप्ताहिक सागर आदित्य 

रंजल्या, गांजल्याच्या सेवेत देव जानावा 

डॉ. अभय पाटील; सोमठाणा डिजीटल शाळेत स्नेहमिलन कार्यक्रम 

मालेगाव :  वैराग्यमुर्ती गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार रंजल्या, गांजल्यामध्ये देव जाणावा, धर्माचे आचरण चिकित्सकवृत्तीने करणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. अभय पाटील यांनी व्यक्त केले. तालुक्यातील सोमठाणा येथील डिजीटल शाळेत २७ फेब्रुवारी रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निंबाजी खंदारे तर उद्घाटक म्हणून डॉ. अभय पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गणेश उंडाळ, सुनील चंदनशिव, दामोधर इंगोले,अमोल पाटील गायकवाड, डॉ. शिवाजी सावळे, डॉ़ दिलीप इंगोले, तानाजी पवार, गजानन आरु, बाळासाहेब वाघ, गजानन इढोळे, उत्तम आरु, डॉ. सुभाष ठोकळ, गजानन व्यवहारे, मंगेश बोरकर, विठ्ठल शिंदे, भावराव खंदारे, अनिल शिंदे, दादाराव शिंदे, विजय वाघ, डॉ. मोहन गोरे, कैलास बोडखे, पंढरी खंदारे, बबन मिटकरी, बळीराम कालवे, बळीराम खंदारे, सुनील घोडमोडे, नितीन वाघ, दत्तराव इंगोले, अंजना देशमुख, संजय वाघ, गणेश इंगोले, विजय शिंदे, दयानंद व्यवहारे आदिंची विचारपिठावर उपस्थिती होती. प्रारंभी जिजाऊ, सावित्रीआईच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुढे डॉ़ पाटील म्हणाले की, देव हा मानण्यापेक्षा जानून घेतल्यास मानवी जन्म सार्थकी लागेल. शिवाय भगव्या रंगाला धर्माशी जोडून तसा प्रचार करुन समाजात असंतोष  पसरविल्या जात असून भगवा रंग हा धर्माचे नव्हे तर ज्ञानाचे प्रितक असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विलास नायक, शिक्षक संतोष शितलकर, रवी कुटे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाचे गावकºयांनी कौतुक केले. दरम्यान, पर्यावरण संवर्धनाचे महत्व जानत समाजसेवी अमोल गायकवाड यांनी शाळेला ८० रोपट्यांची भेट दिली तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास नायक यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन नारायण शिंदे, किर्ती रेडगे यांनी तर आभार प्रदर्शन भागवत मापारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावकरी मंडळीने परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

0 Response to "रंजल्या, गांजल्याच्या सेवेत देव जानावा डॉ. अभय पाटील; सोमठाणा डिजीटल शाळेत स्नेहमिलन कार्यक्रम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article