-->

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी “भाव गौरव यात्रा”   एक आगळीवेगळी टुरिस्ट ट्रेन; 9 जून 2025 रोजी मुंबईहून होणार रवाना.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी “भाव गौरव यात्रा” एक आगळीवेगळी टुरिस्ट ट्रेन; 9 जून 2025 रोजी मुंबईहून होणार रवाना.




साप्ताहिक सागर आदित्य 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी “भाव गौरव यात्रा” 

एक आगळीवेगळी टुरिस्ट ट्रेन; 9 जून 2025 रोजी मुंबईहून होणार रवाना.


वाशिम : दि.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाला वंदन करण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” या विशेष पर्यटक वर्तुळाकार यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत, “भाव गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन” या नावाने एक आगळीवेगळी पर्यटन रेल्वे सुरू करण्यात येत आहे.

या यात्रेची पहिली ट्रेन 9 जून 2025 रोजी मुंबई CSMT स्थानकावरून रवाना होणार आहे. या विशेष प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या किल्ल्यांना भेट दिली जाणार आहे, तसेच या मार्गावर येणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचाही समावेश आहे.

हा उपक्रम केवळ एक पर्यटन मोहीम नसून, आपल्या इतिहासाचे जतन आणि युवा पिढीत अभिमान निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे.


• या उपक्रमाचा प्रचार स्थानिक माध्यमे, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात यावा.

• युवक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.

• दुर्बल व गरजू पार्श्वभूमीतील इच्छुक व्यक्तींना प्रायोजकत्वाच्या माध्यमातून या ऐतिहासिक यात्रेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.



"आपण सर्वांनी मिळून या ऐतिहासिक यात्रेला यशस्वी बनवूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया!"


– वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, वाशिम


अधिक माहिती व सहाय्यासाठी संपर्क:

 गौरव झा, GGM, IRCTC (गौरव ट्रेन यात्रा)

मोबा. क्र.: 82879 31600

Related Posts

0 Response to "छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी “भाव गौरव यात्रा” एक आगळीवेगळी टुरिस्ट ट्रेन; 9 जून 2025 रोजी मुंबईहून होणार रवाना."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article