वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 'भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे
'भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांनी स्विकारले
'विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधुन शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा व संविधानाचा जागर होण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व रॅली दरम्यान संविधानाचे मूलभूत हक्क कर्तव्य राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश असलेले फलक व घोषवाक्य देण्यात आले. यावेळेस या कार्यक्रमाला पं. स. मानोरा येथील गट विकास अधिकारी. भोरकडे तसेच गट शिक्षणाधिकारी अनिल पवार साहेब आर्वजुन उपस्थित होते.
यावेळी त्यांनी संविधानाचे
महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
व शाळेमध्ये कार्यक्रमाची सांगता अध्यक्षाच्या भाषणांनी झाली .या कार्यक्रमाला
शाळेतील शिक्षिका भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगोले मॅडम, सरनाईक मॅडम, इंगळे मॅडम,व शिक्षक वानखडे सर, सतीश भगत सर, राठोड सर, जयस्वाल सर, उजवे सर, शेख सर, भगत सर, मार्गे सर, तायडे सर, पारधी सर, गौतम भगत सर, हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 'भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला"
Post a Comment