
संभाजी साळसुंदर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
संभाजी साळसुंदर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असलेले संभाजी साळसुंदर यांना सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुंबई येथील रंगशारदा सभागृहात शानदार सोहळ्यात सह परिवार नुकताच प्रदान करण्यात आला.
२०२१-२२ या वर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार सर्व क्षेत्रात १०८ शिक्षकांना डिसेंबर मध्ये जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी प्राथमिक गटा मधून मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथील उपक्रमशील शिक्षक संभाजी साळसुंदर यांना जाहीर झाला होता.हा पुरस्कार वितरण सोहळा २४ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहातआयोजित केला होता. महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास,कौशल्य,पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी आ. कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, उच्च व माध्यमिक विभागाचे
शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि विद्या प्राधिकरणचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.सध्या मालेगाव तालुक्यातील घाटा येथील प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण २७ वर्ष सेवा झाली आहे. ९८ पटसंख्या असलेली शाळा आता १३५ पटाची झाली.सरांच्या शैक्षणिक कार्यकाळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टो सतत तीन वेळा साने गुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.लोकवर्गणीतून शाळा रंग रांगोटी,संगणक आणि एलसीडी टीव्ही सह शाळा डिजिटल ,डेस्क बेंच खरेदी,पिण्याच्या पाण्याची सोय,क्रीडा साहित्य ,शालेय विद्युतीकरण करून पंखे बसविणे अशी अनेक कामे केली.कळंबा महाली येथे असताना अध्ययन समृद्धी उपक्रमात प्रथम क्रमांक मिळाला.आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत जवळपास ३० च्या वर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक बनविले. ५ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र केले.
यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,वाशीम येथे विषय सहाय्यक म्हणून काम केले.या काळात त्यांनी वाचन विकास प्रकल्प मध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम केले...संपूर्ण जिल्ह्यात मराठी प्रशिक्षणाना भेट देऊन मार्गदर्शन केले.निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले.केंद्र ,तालुकास्तरावर प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा काम पाहिले.आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले.डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद वाशीम यांनी त्यांचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच माळी समाज सेवा संघ,महाराष्ट्र यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सन्मानित केले.नेहरू युवा केंद्राचा मेगा स्वच्छ अभियानातील सक्रिय सहभाग पुरस्कार सुद्धा मिळाला.
श्री.साळसुंदर हे पुरोगामी विचाराचे पाईक असून सामाजिक व पुरोगामी चळवळीत काम करतात.माळी कर्मचारी सेवा मंडळ वाशीम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,गुणवंतांचा सत्कार करणे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे ,महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणे अशी अनेक कामे केली.
समाजातील ६५ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून लग्न करून दिले तसेच युवक युवती परिचय संमेलन आयोजित केले.रक्तदान शिबिरे आयोजित करून स्वतः रक्तदान केले.१० वी पासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास अजूनही सुरूच आहे.D.Ed, B.A, B.Ed, DSM, MSCIT,M.A. (मराठी),M.A. (इतिहास),M.A.(समाजशास्त्र)सेट (मराठी),सेट (समाजशास्त्र)असून सध्या त्यांची मराठी विषयात P.hd. सुरु आहे .दै.देशोन्नती,सकाळ वर्तमान पत्रात कविता प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी संशोधन पर निबंध सादर केले.प्रत्येक शाळेत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले.वृक्षारोपण व संवर्धन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले.तंबाखू मुक्त शाळा, शाळा सिद्धी ,स्काऊट पथक ,जनगणना आणि निवडणूक कार्य तर आहेच...
अशा उपक्रमशील, निर्व्यसनी,निगर्वी,शांत,प्रेमळ,अभ्यासू,शैक्षणिक दृष्ट्या संपन्न,दूरदृष्टी असलेल्या योग्य व्यक्तिला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Response to "संभाजी साळसुंदर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान"
Post a Comment