
कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत विषेश निवासी शिबिराचे उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
रामनगर-जोडगव्हाण येथे कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत विषेश निवासी शिबिराचे उद्घाटन
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ , अकोला संलग्नित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विमलेश्वर महादेव संस्थान, रामनगर-जोडगव्हाण, तालुका. मालेगाव, जिल्हा. वाशीम येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श संस्काराचे व्यासपीठ असुन व्यक्तिमत्त्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
सेंद्रीय शेती काळजी गरज असे कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगीतले.
यावर्षी युवकांचा ध्यास, ग्राम_ शहर विकास संकल्पनेच्या आधारित कृषि विषयक चर्चा सत्र व प्रात्याक्षिक, योग अभ्यास, पर्यावरण जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम घेणार असल्याची माहिती रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एस. करंगामी यांनी सांगीतले
या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून देशमुख महाराज, तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून . अनिल बोरकर ( शिक्षक) जि. प. प्रा. शाळा, जोडगव्हान व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, आमखेडा येथील डॉ. आर. एस. करंगामी, रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी, प्रा. पी. टी. निचळ, प्रा. एस. टी. जाधव, प्रा. एम. पी. सुरुषे, उदय पुरंदरे आणि संदेश बनसोड कार्यक्रमाला उपस्थित होते. यशस्वी कार्यक्रमासाठी गावचे सरपंच रंजित जाधव, कृषि महाविद्यालय, आमखेडाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, अविनाश जोगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषि महाविद्यालय, आमखेडा व अजिंक्य पिसाळ, कृषि अधिकारी, गी. ह्यु. का. डे. ट्रस्ट यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन खाडे व कू. पूनम वाघमारे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अंजली गव्हाणे यांनी , तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओम महाले या रा. से. यो स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी केले.
0 Response to "कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत विषेश निवासी शिबिराचे उद्घाटन"
Post a Comment