-->

अंगणवाड्या बोलक्या करणाऱ्या ग्रामसेवकांचा सीईओ वाघमारे यांनी केला सत्कार.  आठ पैकी पाच अंगणवाड्या वाशिम तालुक्यातील.

अंगणवाड्या बोलक्या करणाऱ्या ग्रामसेवकांचा सीईओ वाघमारे यांनी केला सत्कार. आठ पैकी पाच अंगणवाड्या वाशिम तालुक्यातील.



 साप्ताहिक सागर आदित्य 

अंगणवाड्या बोलक्या करणाऱ्या ग्रामसेवकांचा सीईओ वाघमारे यांनी केला सत्कार.

आठ पैकी पाच अंगणवाड्या वाशिम तालुक्यातील.


विहित पद्धतीने आणि अतिशय कमी कालावधीत म्हणजे एप्रिल २०२४ अखेर अंगणवाडीची रंगरंगोटी करून त्यांना बोलके करणाऱ्या ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी व इतर मान्यवरांनी प्रमाण पत्र देऊन सत्कार केला. 

सिईओंच्या कक्षात (दि.१०) झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चवरे यांची यावेळी उपस्थिती होती.


वाशिम तालुक्यातील काटा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी डीडी राठोड तनका ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरविंद पडघन अकरा आणि जांभरून महाले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजाब मोरे ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संतोष तुपेकर 

मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायत मोहन वानखडे आणि मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतचे शिशिर शिंदे या ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बोलक्या अंगणवाडी उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सरपंचांचे यावेळी विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विस्तार अधिकारी तथा सीडीपीओ मदन नायक, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक देशमुख आणि पंचायत विभागाचे देवानंद धंतुरे यांनी पुढाकार घेतला.

0 Response to "अंगणवाड्या बोलक्या करणाऱ्या ग्रामसेवकांचा सीईओ वाघमारे यांनी केला सत्कार. आठ पैकी पाच अंगणवाड्या वाशिम तालुक्यातील."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article