
स्व. शंकरराव गनुजी गवळी विद्यालयात शालेय प्रतिनिधी निवडणूक संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. शंकरराव गनुजी गवळी विद्यालयात शालेय प्रतिनिधी निवडणूक संपन्न
अमानी:- येथील स्व. शंकरराव गनुजी गवळी विद्यालयात दिनांक २७ जुलै २०२३ रोजी वर्ग प्रतिनिधी तथा शालेय प्रतिनिधीची निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी वर्ग आठवी,नववी व दहावीचे वर्ग प्रतिनिधी तथा शालेय प्रतिनिधी निवडण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीमध्ये मतदानाला किती महत्त्व आहे याची अनुभव प्रचिती विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान करून घेतली.
यावेळी विद्यालयातील आर. बी.नव्हाळे सर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एस. सरनाईक सर यांनी काम पाहिले.
सर्व विद्यार्थ्यांना व्ही. के. खिल्लारे सर यांनी लोकशाहीचे मूल्य किती महत्त्वाचे असतात याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शालेय प्रतिनिधी मधून जवळपास चार(०४) विद्यार्थ्यांमधून वर्ग दहावीचा कृष्णा गवळी हा शालेय प्रतिनिधी म्हणून निवडून आला. शालेय उपप्रतिनिधी म्हणून कु.गायत्री गवळी ही निवडुन आली. कृष्णा गवळी व गायत्री गवळी याचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी. गवळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी निवडणूक संपन्न झाल्यानंतर वर्ग आठवी चा प्रतिनिधी म्हणून शुभम देवकर याची निवड करण्यात आली. तसेच वर्ग नववीची विद्यार्थिनी कु. स्वाती करवते हीची वर्ग प्रतिनिधी मधून निवड करण्यात आली. तसेच वर्ग दहावीचा प्रतीक नालटे हा वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आला. सर्व निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधी चे विद्यालयातील शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वर्ग ८ वी ते १०वी चे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही..के. खिल्लारे .एन.डी.भिंगे, पी. एस. सरनाईक, आर.बी. नव्हाळे, तसेच विनोद भाऊ गवळी व संदीप भाऊ ठाकरे, डी.जी.तागड यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Response to " स्व. शंकरराव गनुजी गवळी विद्यालयात शालेय प्रतिनिधी निवडणूक संपन्न"
Post a Comment