-->

न.प. निवडणूकीचे वेध सर्वच पक्षाला

न.प. निवडणूकीचे वेध सर्वच पक्षाला

 


साप्ताहिक सागर आदित्य :

वाशीम : नगर पालिका पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे लवकरच निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची शक्यता आहे. वाशीम हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथील नगर परिषद निवडणूक ही सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे वाशिम नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येतात. यावेळी जी प्रभाग पध्दतीने पालीकेची निवडणूक घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची नेतेमंडळी निवडणूकीच्या कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. तर ईच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून निवडणूकीत उतरण्याची तयारी करीत आहेत. प्रभागातील समस्या भेटी-गाठी असे उपक्रम ईच्छुक राबवित आहेत. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठिक नाहीतर बंडाचा झेंडा खांद्यावर घेवून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी अनेक ईच्छुक उमेदवार करताना दिसून येत आहेत.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...


0 Response to "न.प. निवडणूकीचे वेध सर्वच पक्षाला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article