-->

मेडशी येथील बुद्ध विहार परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान

मेडशी येथील बुद्ध विहार परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान

 


साप्ताहिक सागर आदित्य :

द रिअल टायगर फोर्स पुढाकार

मालेगाव : तालुक्यातील मेडशी येथील द रियल टायगर फोर्स व्हाट्सअप्प ग्रुपची समाज प्रबोधनासह समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या स्थापना करण्यात आली आहे.ग्रुपच्या माध्यमातून द रिअल टायगर फोर्सच्या वतीने कपिल वस्तू बुद्ध विहार परिसरातील स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.आवाहनाला प्रतिसाद देत श्रमदान करण्यासाठी अनेक हात पुढे आले. पाहता पाहता सदस्यांनी विहार परिसराची स्वच्छता केली. तणनाशकांची फवारणी केली. परिसर अगदी स्वच्छ केला. 

त्यानंतर ग्रुप सदस्यांची बैठक घेण्यात आली.बैठकीत समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.सदस्यांनी मांडलेल्या समाज सुधारक सूचनेवर चर्चा करण्यात आली.अनेक प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आले. 

याप्रसंगी सुभाष तायडे,विनोद तायडे पत्रकार,डॉ प्रा सचिन तायडे, विधिज्ञ अमोल तायडे,ग्राम पंचायत  सदस्य अमोल तायडे,वानखडे  धाब्याचे संचालक दिपक वानखडे आदींनी यावेळी घम्मदन दिले. कार्यक्रमाला वंचितचे विशाल तायडे, सुधाकर चोथमल, गजानन खिल्लारे , नितिन गायकवाड, सोमेश जाधव  राहुल बोरकर, मंजित तायडे, अतुल तायडे, निखिल गुडदे, मोहन सावळे, पियुष तायडे , रोहित तायडे, कुलदीप सोनूने , आकाश तायडे, स्वप्निल तायडे, नागसेन तायडे, शुभम चक्रनारायन, अतुल सोनूने, आदित्य इंगळे, प्रशिक तायडे, प्रविण घुगे, विजय तायडे, गजानन तायडे आदींनी श्रमदान केले. यप्रसंगीबहुसंख्य द रिअल टायगर ग्रुपचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...

0 Response to "मेडशी येथील बुद्ध विहार परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article