
कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी मोठे पाऊल : पीसीपीएनडीटी कायदा व एमटीपी कायद्यांतर्गत मिळणार १ लाख रुपयांचे बक्षीस
साप्ताहिक सागर आदित्य
कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी मोठे पाऊल : पीसीपीएनडीटी कायदा व एमटीपी कायद्यांतर्गत मिळणार १ लाख रुपयांचे बक्षीस
डीकॉय केससाठी मदत करणाऱ्या गर्भवती महिलेस मिळणार एक लक्ष रूपयांचं बक्षीस
निरागसता साठवू मनात, मुलींचे स्वागत करू घरात !
वाशिम, कन्याभ्रूणहत्येचा वाढता धोका आणि लिंग गुणोत्तर बिघडण्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात एक महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जर लिंग निदान प्रतिबंधक व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी कायदा) किंवा महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम (एमटीपी कायदा) अंतर्गत अनधिकृत गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांविरोधात खात्रीशीर माहिती दिली, आणि त्यामुळे गुन्हा उघडकीस आला तर संबंधित माहितीदाराला रु. १ लक्ष रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. तिचा उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध घालणे, कन्याभ्रूण हत्या थांबवणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे. विशेषतः जिल्ह्यातील नागरिक, आरोग्य कर्मचारी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ही योजना आहे.
पीसीपीएनडीटी कायदा व एमटीपी कायद्यांतर्गत डिकॉय केस यशस्वी झाल्यानंतर तसेच
न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर डिकॉय केस करीता मदत करणाऱ्या गर्भवती महिलेस
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एक लक्ष बक्षीस देण्यात येणार आहे.
गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा किंवा वैद्यकीय गर्भपात कायद्यान्वये राबविण्यात आलेल्या यशस्वी कारवाईबाबत माहिती देणाऱ्या नागरिकास रु. १ लक्ष बक्षीस देण्यात येते.
ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येते व संबंधिताची ओळख जपली जाते.
यासाठी http://amchimulgi.maha.in या पोर्टलवर नोंदणी करता येते.
संपर्कासाठी राज्य पीसीपीएनडीटी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ किंवा १०४ मो. ८४८९८१४०६० वर संपर्क साधता येईल.
सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून कृपया या योजनेचा लाभ घ्या. आपल्या माहितीद्वारे एका चिमुकल्या जीवाला जीवनदान मिळू शकते.
बॉक्स:
कन्याभ्रूणहत्या ही केवळ कायद्याचा विषय नसून, ती सामाजिक चेतनेची गरज आहे. लिंग निदानावर बंदी घालणारा कायदा आणि सरकारची बक्षीस योजना ही समाजात जागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला दिल्यास केवळ एका मुलीचा जीव वाचवला जात नाही, तर संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन बदलतो. जिल्हा प्रशासन या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध आहे.
_जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
बॉक्स:
कन्याभ्रूणहत्या थांबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. बक्षीस योजनेद्वारे जनजागृती होऊन लिंगनिषेधास प्रतिबंध घालण्यास मदत होईल. प्रशासन या अभियानासाठी सज्ज आहे.नागरिकांनी सुध्दा प्रशासनास सहकार्य करावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे
बॉक्स:
लिंग निवड चाचण्या आणि कन्याभ्रूणहत्या ही गंभीर आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्या आहे. वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी बक्षीस योजना ही या समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय करणारी आहे. नागरिकांनी जर अशा बेकायदेशीर चाचण्यांची माहिती दिली, तर प्रशासनाकडून त्वरित कारवाई केली जाईल. ही योजना केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरती मर्यादित नसून, ती स्त्री भ्रूणाच्या संरक्षणासाठी एक शक्तिशाली माध्यम ठरणार आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
_जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे
0 Response to "कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी मोठे पाऊल : पीसीपीएनडीटी कायदा व एमटीपी कायद्यांतर्गत मिळणार १ लाख रुपयांचे बक्षीस"
Post a Comment