-->

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी रोजगाराची संधी   वाशिममध्ये २८ मे रोजी विशेष मेळावा

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी रोजगाराची संधी वाशिममध्ये २८ मे रोजी विशेष मेळावा



 साप्ताहिक सागर आदित्य 

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी रोजगाराची संधी 

वाशिममध्ये २८ मे रोजी विशेष मेळावा


वाशिम,

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


हा रोजगार मेळावा दि. २८ मे  रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशिम येथे होणार आहे.


या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्यांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पात्र उमेदवारांना त्वरित नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.


महत्त्वाचे निर्देश:


उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी www.rojgar.mahaswayam.in किंवा www.ncs.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.


उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत.


महिला व पुरुष उमेदवारांसाठी स्वतंत्र व स्वच्छ प्रतीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रफुल्ल खंडारे ,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्यावतीने करण्यात आले आहे.


संपर्क:

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम

फोन: ०७२५२-२३१४९४

ई-मेल: washimrojgar@gmail.com

Related Posts

0 Response to "आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी रोजगाराची संधी वाशिममध्ये २८ मे रोजी विशेष मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article