-->

कै. कांताबाई देवराव चातुरक यांचे मरणोत्तर नेत्रदान

कै. कांताबाई देवराव चातुरक यांचे मरणोत्तर नेत्रदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कै. कांताबाई देवराव चातुरक यांचे मरणोत्तर नेत्रदान


मौजे माळेगाव ता. जि. वाशिम येथील प्रमोद देवराव चातूरकर यांची आई स्व.

कांताबाई देवराव चातुरकर यांच्या वयाच्या ७० व्या वर्षी दिनांक ०५/११/२०२३ रोजी


रात्री ७:०० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच


संपुर्ण चातूकर कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच


समाजकार्याची आवड असलेल्या कै. कांताबाई देवराव चातुरकर यांचे निधन झाल्याने


संपुर्ण चातूकरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना चातूकरकर कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा माळेगांव येथील सरपंच  प्रमोद चौधरी याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, डॉ. पूरी, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी  ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक  रमेश ठाकरे यांनी स्व. कांताबाई देवराव चातूरकर यांची नेत्र बुबूळे काढली व नेत्र बुबूळे त्याच दिवशी गणपती नेत्र रुग्णालय जालनांकडे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता चातूरकर कुटूर्वियाचे सहकार्य लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तीनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन चातूरकर कुटूंबाचे आभार मानले आहेत.

नेत्रदानासाठी संपर्क क्रं. ९९२२५१९९४८ (जि.रु. बाशिम)

'जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक

सामान्य रुग्णालय वाशिम

Eye Donation Publicity/ ओम

0 Response to "कै. कांताबाई देवराव चातुरक यांचे मरणोत्तर नेत्रदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article