-->

१०० वर्षाच्या शताब्दी वर्षपुर्तीनिमित्त ३०० किमी सायकल मोहीम यशस्वी  एका महिलेसह २० सायकलप्रेमींचा सहभाग

१०० वर्षाच्या शताब्दी वर्षपुर्तीनिमित्त ३०० किमी सायकल मोहीम यशस्वी एका महिलेसह २० सायकलप्रेमींचा सहभाग

 


साप्ताहिक सागर आदित्य 

१०० वर्षाच्या शताब्दी वर्षपुर्तीनिमित्त ३०० किमी सायकल मोहीम यशस्वी

एका महिलेसह २० सायकलप्रेमींचा सहभाग

अमरावती पोलीस उपायुक्त व तहसिलदारांचा सहभाग

वाशिम रंडोनियअर व वाशिम सायकलस्वार ग्रुपचा उपक्रम

वाशिम - सायकल जनजागृतीतुन पर्यावरणाच्या बचावाचा उदात्त हेतू समोर ठेवून सायकलप्रेमींच्या पुढाकारातुन १९२२ साली फ्रान्समध्ये सुरु केलेली सायकलींगची चळवळ आता जगभर फोफावली असून ३०० किलोमिटरच्या लांब पल्ल्याच्या या मोहीमेला १०० वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त वाशिम रंडोनियअर व वाशिम सायकलस्वार ग्रुपच्या वतीने १२ जुन रोजी सलग २० तासांची बीआरएम सायकल मोहीम घेण्यात आली.

    मोहीमेचा प्रारंभ स्थानिक शर्मा पेट्रोलपंपाजवळ करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी युसुफ शेख, कॉमर्स अकॅडमीचे आदेश कहाते व महिला विकास अधिकारी वासुदेव ढोणे यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहीमेचा प्रारंभ केला. यानंतर ही मोहीम वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, खेर्डा, अमरावती, नांदगावपेठ, माहुली व परत त्याच मार्गे सलग २० तासांच्या या मोहीमेचा समारोप करण्यात आला. या मोहीमेत अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी, अमरावतीचे तहसिलदार संतोष काकडे, उद्योगपती नंदकिशोर राउत, सनदी लेखापाल मारोती भोयर, नारायण ढोबळे, पवन खंडेलवाल, अक्षय गावंडे, जितेश कोशटवार यवतमाळ, राम नव्हाळ अहमदनगर, अमरावती येथून श्रीमती सोनी मोटवाणी, देवानंद भोजे, विजय धुर्वे, महेश मेश्राम, विनोदसिंह चव्हाण, डॉ. सागर धांडोळकर, संदीप हटकर, प्रशांत अघाव, केशव निकम यांनी आपला सहभाग नोंदवत ३०० किमीची ही मोहीम यशस्वीरित्या पुर्ण केली. या मोहीमेत अमरावतीचे डॉ. सागर धांडोळकर यांना एसआर पदवी प्रदान करण्यात आली. मोहीमेदरम्यान मार्गात सायकलपटुंना वाशिम रंडोनियर ग्रुपचे आयोजक चेतन शर्मा, निरज चारोळे, राजेश जाधव, पवन शर्मा, युसुफ शेख, आदेश कहाते, सागर रावले, सौ. रेखा रावले यांनी ठिकठिकाणी मदत केली.

    सायकलीच्या माध्यमातुन लोकांना निरोगी आरोग्य आणि पर्यावरणाचे महत्व लक्षात यावे यासाठी वाशिम येथील युवकांनी सुरु केलेल्या चळवळीत राज्यभरातुन सायकलप्रेमी सहभागी होत असून लोकांना सायकलीचे महत्व लक्षात येत असल्यामुळे आमचा हेतू साध्य झाल्याचे चेतन शर्मा यांनी सांगीतले.

आहे.


       



 


Related Posts

0 Response to "१०० वर्षाच्या शताब्दी वर्षपुर्तीनिमित्त ३०० किमी सायकल मोहीम यशस्वी एका महिलेसह २० सायकलप्रेमींचा सहभाग"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article