
अंगणवाडी केंद्रामध्ये पुन्हा उत्साहाला उधाण बालशिक्षणाला सुरुवात
साप्ताहिक सागर आदित्य
कोरोना काळात दोन वर्ष लहान बालकांसाठी, प्रत्यक्ष पूर्व शालेय शिक्षणासाठी बंद राहिलेली अंगणवाडी केंद्र पुन्हा जोमात सुरू झाली आहेत. या काळात अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षण, शासनस्तरावरून मागवलेली वेग वेगळी - योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली माहिती ,मिशन वात्सल्य अंतर्गत कुटुंबीयांचे सर्वेक्षण, दियांग माहिती, राशन वाटप , रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे,लसीकरण, घरपोच आहार वाटप, गरोदर स्तनदा यांना मार्गदर्शन इत्यादी कामे केली. परंतु कुठेतरी पूर्व शालेय शिक्षण प्रत्यक्ष देण्याचां अनुभव सतत आठवत होता. महिन्यातील 16 ते 20 दिवस तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व शालेय शिक्षण देणे ही अंगणवाडी सेविकांच्या सहा सेवेपैकी आवडी ची व त्यांना स्वतःलाच पुन्हा पुन्हा नवीन कामासाठी ताजीतवानी करणारी सेवा आहे. कोरोना काळामध्ये नाही म्हणायला सेविका व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पालकांना पूर्व शालेय शिक्षणाचे ई आकार अंतर्गत राज्य स्तरावरून प्राप्त होणारे व्हिडिओज पाठवीत होत्या. तसेच गृह भेटींच्या द्वारे ऑनलाइन शक्य नसलेल्या पालकांपर्यंत, मुलांपर्यंत शालेय शिक्षणाच्या कृती पोचवीत होत्या. आरंभ अंतर्गत जन्मलेल्या बाळापासून तर तीन वर्षाच्या बाळापर्यंत सुद्धा पालकांनी बालका सोबत खेळ व संवादाच्या माध्यमातून त्यांच्या बौद्धिक विकासाला कशाप्रकारे चालना द्यावी हे सांगत होत्या. परंतु प्रत्यक्ष सर्वांना एकत्र घेऊन शिकविण्याचा आनंद व मुलांना आपल्याच वयाच्या इतर मुलांसोबत शिकण्याचा आनंद , त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव पाण्याचा आनंद सेविकांना व मुलांनाआता अंगणवाडी नियमित सुरू झाल्या मुळे मिळत आहे. हा आनंद असाच द्विगुणित हो मुलांच्याही बुद्धी विकासासोबत सामाजिक, भावनिक विकास साठी व मोबाईल गेमिंग ची लागलेली सवय सहज सुटण्यासाठी अंगणवाडी केंद्रे नियमित सुरू असणे आवश्यक आहे
0 Response to "अंगणवाडी केंद्रामध्ये पुन्हा उत्साहाला उधाण बालशिक्षणाला सुरुवात"
Post a Comment