-->

कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करा  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे निर्देश

कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे निर्देश

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करा

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे निर्देश

  

वाशिम, मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याची कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांनी अभिलेख्यांची तपासणी करावी. संबंधित यंत्रणांनी सन 1948 ते 1967 या कालावधीतील अभिलेखामधील कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

                     आज 6 नोव्हेंबर रोजी मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी न्या.संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या स्विकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी संबंधित यंत्रणेचा वाकाटक सभागृहात आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक अभिनव बालुरे,उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,नगर पालिका प्रशासन अधिकारी श्री.सोनवणे व प्रभारी पोलीस उपअधिक्षक यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

             श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, ज्या-ज्या विभागाकडे कुणबी जातीची नोंद असलेले तत्कालीन कागदपत्रे असतील ते शोधून ठेवावे. शिक्षण विभागाने त्यांच्याकडे असलेल्या खारीज रजिस्टरमधील कुणबी नोंदी, भूमि अभिलेख विभागाने टिपण बुक व प्रति बुकामध्ये ह्या नोंदी तपासाव्यात. महसूल विभागाने खासरापत्रक, पाहणीपत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना क्र.1 हक्क नोंदपत्रक, नमुना क्र.2 हक्क नोंदपत्रक व सातबारा उतारा. जन्म-मृत्यू रजिस्टर संबंधितचे अभिलेखे यामध्ये गाव नमुना क्र. 14, शैक्षणिक अभिलेखे- प्रवेश निर्गम नोंदवही/जनरल रजिस्टर. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे- अनुज्ञप्ती नोंदवहया, मळी नोंदवही, ताडी नोंदवही,आस्थापना अभिलेख.कारागृह विभागाचे अभिलेखे- रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्चा कैद्यांची नोंदवही. पोलीस विभागाचे अभिलेखे यामध्ये गाववारी, गोपनीय रजिस्टर सी-1, सी-2, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफआयआर रजिस्टर. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेखे- खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत,इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकेपत्रक, बटाईतपत्रक, दत्तकविधानपत्रक,मृत्यूपत्रक, इच्छापत्रक,तडजोडपत्रक, इतर दस्त. भूमि अभिलेख विभागाच्या अभिलेखामध्ये पक्काबुक, शेतवारपत्रक,वसूली बाकी,ऊल्ला प्रतीबुक,रिव्हीजन प्रतीबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणीपत्रक. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील अभिलेखांमध्ये माजी सैनिकांच्या नोंदी. जिल्हा वफ्क अधिकारी यांच्याकडील अभिलेखे- मुंतखब. शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशीलाबाबतची अभिलेखे- सन 1967 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचा सेवांचा तपशील आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेखे- वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व त्याची कारणे आदी अभिलेख्यांमध्ये असलेल्या कुणबी नोंदणी तपासून घ्याव्यात. असे त्या यावेळी म्हणाल्या. 

 श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, ह्या सर्व नोंदी एक महिन्याच्या आत संबंधित यंत्रणांनी एकत्रिक कराव्यात. सर्व नोंदींची माहिती काळजीपूर्वक संकलीत करावी. या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून संबंधित विभागाचा एक कर्मचारी या कक्षासाठी नियुक्त करण्यात यावा. दररोज सायंकाळी 6 वाजता संबंधित विभागाने संकलीत केलेली दररोजची माहिती उपलब्ध करुन दयावी. कुणबी जात प्रमाणपत्र किती जणांना दिले तसेच कुणबी-मराठा व मराठा-कुणबी ह्या नोंदी असलेले प्रमाणपत्र किती जणांना दिले हे सुध्दा शोधावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

                     

0 Response to "कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम मिशन मोडवर करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे निर्देश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article