
जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'क्यू आर कोड अटेंडन्स' प्रणाली लागू होणार. वाशिम झेडपीचा हायटेक उपक्रम.
साप्ताहिक सागर आदित्य
बायोमेटिक्स गेले, आता क्यूआर कोड आले!
जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'क्यू आर कोड अटेंडन्स' प्रणाली लागू होणार.
वाशिम झेडपीचा हायटेक उपक्रम.
वाशिम:
मुख्यमंत्री यांच्या 150 दिवशीय कार्यालयीन कामकाज सुधारणा मोहिमेअंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनोखा परंतु लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेतीन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी ऐवजी आता मोबाईल ॲप द्वारे क्यू आर कोड स्कॅन करून दिवसातून 3 वेळा हजेरी (अटेंडन्स) द्यावी लागणार. विशेष म्हणजे हे क्यू आर कोड जिओ टॅग असणार आहेत. येणाऱ्या काही दिवसातच जिल्हा परिषदेमार्फत 'क्यू. आर. कोड अटेंडन्स सिस्टीम' सर्वांना लागू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयात बायोमेट्रिक्स द्वारे हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र यामध्ये प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जसे की बायोमेट्रिक मशीन मध्ये बिघाड होणे, तांत्रिक अडचणीमुळे बायोमेट्रिकचा मंथली रिपोर्ट जनरेट न होणे. काही कामचुकार कर्मचारी या बाबींचा गैरफायदा घेत होते. त्यामुळे गाव खेड्यातून आलेल्या सामान्य जनतेला सेवा देण्यास अडथळा निर्माण होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली. यावर उपाय म्हणून ही डिजिटल क्यू आर कोड अटेंडन्स सिस्टीम लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
----------------------------
जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायती, 769 शाळा, 58 पशुवैद्यकीय दवाखाने, 6 पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हा परिषद मुख्यालयातील 14 विभाग यासह जि. प. अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व कार्यालयात बायोमेट्रिक ऐवजी क्यू आर कोड अटेंडन्स लागू करण्यात येणार आहे.
कार्यालयाच्या 100 मीटर परिघातून अटेंडन्स दिली तरच हजेरी लागणार अन्यथा बाहेरील ठिकाणाहून क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्या ठिकाणाची माहिती तर कळणारच परंतु सदर कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याची नोंद ॲप वर होणार आहे.
--------------------------
डिजिटल अटेंडन्स ॲप वर मिळणार ह्या सुविधा:
क्यू आर कोड द्वारे हजेरी देणाऱ्या मोबाईल ॲपवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.
1. एका क्लिकवर मिळणार जीपीएफ स्लिप.
2. एका क्लिकवर मिळणार पेमेंट स्लिप.
3. एका क्लिकवर मिळणार महत्त्वाचे शासन निर्णय.
----------------------------------------
क्यू आर कोड अटेंडन्सचे फायदे:
➡️ हजेरीसाठी रांगेत उभे राहायची गरज नाही.
➡️प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलावर क्यू आर कोड ची सुविधा.
➡️बायोमेट्रिकच्या तुलनेत अत्यल्प खर्च येणार.
➡️प्रामाणिक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच.
➡️ दिवस, आठवडा व महिन्याचाही रिपोर्ट पाहता येणार.
0 Response to "जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'क्यू आर कोड अटेंडन्स' प्रणाली लागू होणार. वाशिम झेडपीचा हायटेक उपक्रम. "
Post a Comment