-->

कै. भाऊरव गूलाबराव गावंडे यांचे मरणोत्तर नेत्रदान

कै. भाऊरव गूलाबराव गावंडे यांचे मरणोत्तर नेत्रदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कै. भाऊरव गूलाबराव गावंडे यांचे मरणोत्तर नेत्रदान


मौजे पोटी ता. मंगरुळपिर जि. वाशिम येथील देवराव गुलाबराव गावंडे यांचे भाऊ स्व. भाऊराव गुलाबराव गावंडे यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी दिनांक १८/११/२०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण गावंडे कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. भाऊराव गुलाबराव गावंडे यांचे निधन झाल्याने संपुर्ण गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना गावंडे कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करून दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा नेत्रचिकित्सा अधिकारी  केशव पवार याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कारणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बेळकर नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, डॉ. पूरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी  गणेश व्यवहारे व नेत्रदान समुपदेशक  रमेश ठाकरे यांनी स्व. भाऊराव गुलाबराव गावंडे यांची नेत्र बुबूळे काढली व नेत्र बुबूळे त्याच दिवशी गणपती नेत्र रुग्णालय जालनाकडे पाठविण्यात आली, तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता गावंडे मुटूबिंबाचे सहकार्य लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन गावंडे कुटूंबाचे आभार मानले आहेत.


नेत्रदानासाठी संपर्क क्र. ९९२२५१९९४८ (नि.रु.वाशिम)

0 Response to "कै. भाऊरव गूलाबराव गावंडे यांचे मरणोत्तर नेत्रदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article