
"कंपोस्ट खड्डा भरु- आपले गाव स्वच्छ ठेवू" अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ!
साप्ताहिक सागर आदित्य
"कंपोस्ट खड्डा भरु- आपले गाव स्वच्छ ठेवू" अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ!
वाशिम दि.१ मे,
"कंपोस्ट खड्डा भरु- आपलं गाव स्वच्छ ठेवू" या अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पंचायत समिती मंगरूळपीर अंतर्गत ग्रामपंचायत मंगळसा येथे *"कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेऊ"* मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील नाडेप खत खड्डा भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. गावातील कचरा गोळा करून त्याचे खतात रूपांतर केल्यास गावातील लोकांच्या आरोग्य तर सुधारतेच, त्याचबरोबर शेतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे खत निर्मिती सुद्धा होते. अशा दुहेरी फायद्याच्या योजनेसाठी प्रत्येक गावात लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार खोडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला सुरेशभाऊ लुंगे, पुरुषोत्तम चितलांगे, वीरेंद्रसिंह ठाकूर, चंद्रकांत पाकधने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समिती मंगरूळपीरचे गटविकास अधिकारी श्रीराम कुळकर्णी, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. साखरे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण, मंगळसा ग्रामपंचायतचे प्रशासक भाऊराव बेलखेडकर, ग्रामपंचायत अधिकारी मुकेश सुरडकर, स्वच्छ भारत अभियानाचे गट समन्वयक प्रविण आखाडे, अभिजीत गावंडे, ग्रा. पं. कर्मचारी अरुण राऊत व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
------------
*"महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेले हे अभियान पुढील एक महिनाभर चालणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांचा आढावा घेणार आहेत."*
-श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
0 Response to ""कंपोस्ट खड्डा भरु- आपले गाव स्वच्छ ठेवू" अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ!"
Post a Comment