-->

रिस़ोड तहसील कार्यालयात  नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष सूरू  आपत्ती काळात संपर्क साधावा

रिस़ोड तहसील कार्यालयात नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष सूरू आपत्ती काळात संपर्क साधावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

रिस़ोड तहसील कार्यालयात

नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष सूरू

आपत्ती काळात संपर्क साधावा 

वाशिम, रिसोड तालुक्यामध्ये  जुन २०२३ महीन्यात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प होते.परंतु माहे जुलै महीन्यात पावसाचे स्वरुप बदलले आहे.जुलै महीन्यातील या आठवड्यात रिसोड तालुक्यामध्ये

संततधार पाऊस सुरु आहे.संततधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या व नाल्यांना पुर येण्याची शक्यता

नाकारता येत नाही.अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीच्या घटना जशा की पुर,विज पडणे,पुरामुळे गावाचा

संपर्क तुटणे किंवा इतर नैसर्गीक आपत्तीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      रिसोड तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी नदी/नाल्यांना पुर आल्यास त्या ठिकाणाहुन व पुलावरुन पाणी जात असल्यास रस्ता ओलांडु नये तसेच नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यास नदी/नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.पुरसदृश्य निर्माण झाल्यास शक्यतोवर गुरे ढोरे बाहेर सोडु नये.     

             तहसील कार्यालय रिसोड येथे नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यान्वित करण्यात आला आहे.तालुक्यात नैसर्गीक आपत्ती संदर्भात कोणतीही घटना घडल्यास किंवा घडण्याची शक्यता असल्यास,नैसर्गीक आपत्तीच्या स्थळी मदत व सहकार्य पोहचविण्याच्या दृष्टीने पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.तालुका नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष रिसोड,नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष- ०७२५१-२२२३१६,

तहसीलदार रिसोड ८६६९७३६४९४,

पोलीस निरीक्षक,रिसोड ८२०८३२८५३२,मुख्याधिकारी,नगर परिषद,रिसोड ८७९३८४०२०५ गटविकास अधिकारी,रिसोड ९१३०७८८४४४ असे त्यांचे संपर्क क्रमांक असल्याची माहिती तहसीलदार तथा अध्यक्ष,तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रिसोड यांनी दिली.

Related Posts

0 Response to "रिस़ोड तहसील कार्यालयात नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष सूरू आपत्ती काळात संपर्क साधावा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article