-->

पूर परिस्थिती व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे

पूर परिस्थिती व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पूर परिस्थिती व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे

वाशिम, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने वाशिम तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करावे. नदी नाले व ओढयाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदिपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडु नये, पुल पाहण्यासाठी गर्दी करु नये, जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये, अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उद्भवु शकतो. धोकादायक ठिकाणी चढु व उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढु नये, मेघगर्जना होत असतांना झाडाच्या खाली न थांबता सुरक्षीत स्थळी आश्रय घ्यावा. तसेच प्रत्येक नागरीकांनी दामीनी अॅप डाऊनलोड करुन घ्यावे. आपतकालीन परिस्थीतीत जवळचे तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नैसर्गीक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष वाशिम: ०७२५२-२३२००८, तहसिलदार वाशिम: ९९७००८७१००,पोलीस निरीक्षक वाशिम ग्रामीण:- ९९२३०४८६५५,पोलीस निरीक्षक वाशिम शहर:- ७८७५३००३४८,पोलीस निरीक्षक अनसिंग:- ७८८७३२९४६४,मुखधिकारी, नगर परिषद वाशिम: ७९७२१०३२४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे

तहसिलदार तथा अध्यक्ष

तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, वाशिम यांनी कळविले आहे.

Related Posts

0 Response to "पूर परिस्थिती व आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article