
कोयाळी ( बु ) येथील सरपंच आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत..
साप्ताहिक सागर आदित्य
कोयाळी ( बु ) येथील सरपंच आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत..
सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण..
आदर्श सरपंच सन्मान "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा सरपंच गजानन आनंदा वानखडे ग्रामपंचायत कोयाळी (बु )री येथे उल्लेखनीय कार्य केल्याबद्द्धल ,अहिल्यानगर येथे मकरंद अनासपुरे मराठी सिने अभिनेता, एकनाथराव ढाकणे ग्रामसेवक नेते, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली संकुल अहिल्यानगर येथे आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी रिसोड तालुक्यातील कोयाळी (बु )गावचे सरपंच गजानन वानखडे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले,
यावेळी त्यांचे लहाने बंधू अनिकेत वानखडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिसडे, ग्रा. पं कर्मचारी रितेश वानखडे, सुमेध वानखडे, प्रशांत खरबळकर, उपस्थित हा पुरस्कार स्विकारला, गजानन वानखडे ( सरपंच ) आपल्या पदाच्या माध्यमातून करत असलेल्या कामांचे मान्यवरांनी कौतुक केले, कोणताही पुरस्कार मिळाला तर त्यातून निश्चितपने अधिक चांगले काम केले पाहिजे, असा या पुरस्कार देण्याचा उद्देश असतो, या पुरस्काराला अनुरूप असंच कार्य सतत भविष्यात करत राहावे, अशी अपेक्षा मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पुरस्कार वितरनाच्या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या कोयाळी ( बु ) गावातील जनतेला आपल्या सरपंच ला पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद झाला, व गावासाठी असंच कार्य सतत करत राहावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांची आहे,
0 Response to "कोयाळी ( बु ) येथील सरपंच आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत.."
Post a Comment