-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जल सप्ताह

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जल सप्ताह



 साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जल सप्ताह 

निमित्ताने राष्ट्रीय हरित सेना वनराई इको कलब चे प्रभारी शिक्षक विकलसिंग राठोड सर यांनी विद्यार्थी यांच्या समवेत जलप्रतिज्ञा घेतली असता त्या मधे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी पाणी हे जीवन असुन त्याचा वापर गरजेप्रमाणे व काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळा, गैरवापर करु नका असे आवाहन त्यांनी केले तर विकलसिंग राठोड यांनी पाण्याचे महत्व पटवून देतांना नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठा करणार्‍या ज्या पायाभूत सुविधा चे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेतली या वेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत, रूपेश जयस्वाल, निलेश उजवे, सतीश भगत, चंद्रशेखर वानखडे, सविता भालेराव, वैशाली चातुरकर, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, तेजस्विनी इंगळे, सुरेश पारधी इत्यादी कर्मचारी  शाळेचे सर्व विद्यार्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विकलसिंग राठोड राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक यांनी केले होते

Related Posts

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जल सप्ताह "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article