
वाशिम जिल्हा परिषद राज्यात चौथ्या क्रमांकावर. भारतीय गुणवत्ता परिषदेने केले मूल्यमापन.
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्हा परिषद राज्यात चौथ्या क्रमांकावर.
भारतीय गुणवत्ता परिषदेने केले मूल्यमापन.
वाशिम दि. 2 मे
राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होणे आणि शासन- प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेने बाजी मारली असून महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे.
मागील महिन्यात 24 तारखेला भारतीय गुणवत्ता परिषदेकडून वाशिम जिल्हा परिषदेचे मूल्यमापन करण्यात आले. यासाठी केंद्राचे पथक दाखल जिल्ह्यात झाले होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. तपासणी दरम्यान वाशिम झेडपी ला 72 टक्के गुण मिळाले.
-----------------
सर्वोत्तम सीईओ वैभव वाघमारे:
"भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या मूल्यांकनाद्वारे महाराष्ट्रात चार जिल्हा परिषदेचे सीईओ सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे त्यांचा समावेश आहे."
-----------
भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत विभागाचे संकेतस्थळ, कार्यक्षमता, कार्यालयीन सोयी सुविधा, तक्रार निवार व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा सात निकषावर आधारित मूल्यांकन करण्यात आले.
-------------
0 Response to "वाशिम जिल्हा परिषद राज्यात चौथ्या क्रमांकावर. भारतीय गुणवत्ता परिषदेने केले मूल्यमापन."
Post a Comment