
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट उज्वल दैदिप्यमांन निकालाची परंपरा कायम..
साप्ताहिक सागर आदित्य
भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट उज्वल दैदिप्यमांन निकालाची परंपरा कायम..
स्थानिक.रिसोड.............महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एच.एस. सी. बोर्ड फेबु-मार्च 2025 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये रिसोड तालुक्यातील एकमेव उपक्रमशील व नाविन्यपूर्ण अग्रगण्य अश्या भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थिनींनी दैदीप्यमान यश संपादन केले असून. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत एकूण भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल99.20% टक्के लागला असून . विज्ञान शाखेचा निकाल 100% टक्के लागला यामध्ये प्रथम कु. धनश्री देविदास खरात 84.83%, द्वितीय कु.आरती भागवत खडसे 82.67%, तृतीय कु. गायत्री देविदास पुंड 82.33%, आणि चतुर्थ कु. जानवी गोपाळराव तायडे 82.00%., तसेच वाणिज्य शाखेचा निकाल 100%टक्के लागला असून प्रथम कु.भाग्यश्री तुळशीराम कोकाटे 82.67%, द्वितीय कु. अश्विनी नामदेव नवघरे 82.50%, तृतीय कु. नम्रता राजू जाधव 81.67%., कला शाखेचा निकाल 98. 00%टक्के लागला . प्रथम कु.कमल बबन नवघरे 78.67%, द्वितीय कु. तेजस्विनी दिनकर बुधनेर 76.50%, तृतीय कु. सलोणी संजय गायकवाड 75.50%. या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते आदरणीय भाऊसाहेब देशमुख, तेसेच संस्थेच्या विश्वस्त आदरणीय जयश्रीताई देशमुख, संस्थेचे सचिव युवानेते एड. नकुलदादा देशमुख, भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम, सर्व शिक्षक ,शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग या सर्वांनी या गुणवंत विद्यार्थिनींचे भरपूर कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट उज्वल दैदिप्यमांन निकालाची परंपरा कायम.."
Post a Comment