
महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग राज्यस्तरीय स्पर्धेत हिंदवी आंबेकरला सुवर्णपदक. 'बेस्ट फायटर' म्हणूनही सन्मानित.
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग राज्यस्तरीय स्पर्धेत हिंदवी आंबेकरला सुवर्णपदक.
'बेस्ट फायटर' म्हणूनही सन्मानित.
बारामती पुणे येथे दि. 26 व 27 एप्रिल 2025 रोजी शरयु प्रतिष्ठान द्वारा आयोजित 5 व्या महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग राज्यस्तरीय स्पर्धेत वाशीम येथील कानडे इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिकणारी कु. हिंदवी शंकर आंबेकर हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत तिने सलग चार राऊंड जिंकत फायटिंग मध्ये अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या प्रतिस्पर्ध्यावर 4 - 0 अशी बाजी मारली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हिंदवीच्या उत्कृष्ट सादरीकरणं मुळे तिला बेस्ट फायटर ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी सुद्धा कुमारी हिंदवीने जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षीसं पटकावली आहेत. तिच्या या यशाचे श्रेय तीने तिचे गुरु व कोच सेन्साई निखिल देशमुख यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Response to "महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग राज्यस्तरीय स्पर्धेत हिंदवी आंबेकरला सुवर्णपदक. 'बेस्ट फायटर' म्हणूनही सन्मानित. "
Post a Comment