-->

३० एप्रिलपर्यंत सहभाग नोंदणी; विजेत्या गावांना भरघोस पारितोषिके

३० एप्रिलपर्यंत सहभाग नोंदणी; विजेत्या गावांना भरघोस पारितोषिके



साप्ताहिक सागर आदित्य 

सुजलाम सुफलाम होण्यासाठी जलतारा अभियानात सहभागी होऊया 


पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम


३० एप्रिलपर्यंत सहभाग नोंदणी; विजेत्या गावांना भरघोस पारितोषिके


पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वाशिम जिल्हा प्रशासनाने " जलतारा अभियान २०२५" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जलतारे तयार केले जातील आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना मोठ्या प्रमाणावर पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.


जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान १ मे ते २० मे २०२५ दरम्यान राबविले जाणार असून, ३० एप्रिल २०२५ ही सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. आजअखेर १४५ गावांनी आपला सहभाग नोंदवला असून, काही गावांच्या मागणीनुसार नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे.


कामकाजाची रूपरेषा

१ मे ते २० मे २०२५ : जलतारा निर्माण कालावधी

२२ मे २०२५ : जलतारा नोंदवही सादर करण्याची अंतिम तारीख

२३ मे ते २७ मे २०२५ : जलतारा तपासणी 

७ जून २०२५ : पारितोषिक वितरण समारंभ


पारितोषिकांचे स्वरूप:

जिल्हास्तरावर विजयी गावांसाठी :

प्रथम क्रमांक : ₹ १,११,१११

द्वितीय क्रमांक : ₹ ७७,७७७

तृतीय क्रमांक : ₹ ५५,५५५


तालुकास्तरावर विजयी गावांसाठी :

प्रथम क्रमांक : ₹ ५१,५५१

द्वितीय क्रमांक : ₹ ३१,१३१

तृतीय क्रमांक : ₹ २१,१२१


याशिवाय, तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२ शेतकऱ्यांना वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.


जलतारा निर्मितीचे निकष : 

मनरेगा योजनेतून किंवा शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून तयार केलेले शोष खड्डेच ग्राह्य धरले जातील.

जलतारा GPS सह नकाशावर नोंदविला जाणे आवश्यक.

खताचे खड्डे किंवा अपूर्ण जलतारे ग्राह्य धरले जाणार नाहीत.


जलतारेची संख्या जिल्हास्तरावर किमान ३५० किंवा लक्षांकाच्या ३५ टक्के क्षमतेची व तालुकास्तरावर २५० किंवा लक्षांकाच्या २५ टक्के क्षमतेची असणे बंधनकारक आहे.


पारितोषिक रक्कम ग्रामसभेच्या मंजुरीने गावातील जलसंधारण व जलसंपत्ती वृद्धीच्या कामासाठीच वापरणे बंधनकारक राहणार आहे. पाणीदार व संपन्न वाशिमसाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.


संबंधित गावांनी पुढील तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा :


वाशिम – कृितका नागमोते (8390165001)

मालेगाव – शुभम वाळुकर (9673454536)

रिसोड – राहुल पांडे (9168103869)

मंगळपीर – अमोल हिंसेकर (9422920877)

कारंजा – प्रेमानंद राऊत (9284924080)

मानोरा – प्रियंका वालकर (7768865052)

असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Related Posts

0 Response to "३० एप्रिलपर्यंत सहभाग नोंदणी; विजेत्या गावांना भरघोस पारितोषिके"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article