
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक वाशिम
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक वाशिम आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी बालविकास प्रकल्प कार्यालय शहरी विभाग वाशिम यांच्या कार्यालयात कारंजा आणि वाशिम शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन केले . निकृष्ट दर्जाचा मोबाईल शासनाने 2019 मध्ये अंगणवाडी सेविका यांना दिला परंतु मोबाईल हा हॅग होतो,गरम होतो, आपोआप डिस्प्ले जातो, कमी रॅम असल्याने कोणतीही माहिती कार्यालयाला पाठविता येत नाही. पोषण ट्रॅक्टर अॅप हे मराठी भाषेमध्ये नाही या इतर कारणांमुळे सेविका काम करतांना वैतागून गेलेल्या आहेत. या अगोदर सुध्दा मोबाईल वापसी आंदोलन केले होते, शासनाच्या आश्र्वासन मुळे आंदोलन मागे घेण्यात आले.पोषण टॅंकर अॅप मराठी भाषेमध्ये व्हावे, माहागाईचा विचार करून भरघोस मानधन वाढ व्हावी, उत्कृष्ट दर्जाचा मोबाईल शासनाने द्यावा या व इतर मागण्या मान्य करण्यासाठी भस्मे मॅडम सिडीपीओ नागरी प्रकल्प वाशिम यांना परत करण्यात आले. आंदोलनामध्ये सहभागी काॅ. अंभोरे, सविता इंगळे, मायावती डोंगरे, संगिता नवघन, नंदा गोटे,किरण पडघान, संगिता कांबळे,अनिता इंगोले, रंजना पांडे, वंदना सुतार, अश्विनी श्रीराव, आपटे,या व इतर अंगणवाडी सेविका मोबाईल वापसी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या.
0 Response to "महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना आयटक वाशिम"
Post a Comment