
पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज अनिल मस्के यांचे प्रतिपादन ; व्हॉईस ऑफ मीडियाचा कुटुंब स्नेहमिलन सोहळा
साप्ताहिक सागर आदित्य
पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज
अनिल मस्के यांचे प्रतिपादन ; व्हॉईस ऑफ मीडियाचा कुटुंब स्नेहमिलन सोहळा
वाशीम : समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून पीडितांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणाºया पत्रकार दुर्लक्षिल्या जात असल्याची वास्तविकता आहे. अल्पशा मानधनावर जनसेवेत उभे आयुष्य घालविणाºया पत्रकार शासन, प्रशासन किंबहूना समाजस्तरावरही दुर्लक्षित राहतो. त्यामुळे पत्रकार कुटुंबियांना विनातारण कर्ज पुरवठा करता यावा या दृष्टीने पत्रकार कुटुंबियांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ नेमण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हॉईस ऑफ मीडिया शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन संघटनेचे ग्रामीण राज्याध्यक्ष अनिल मस्के यांनी व्यक्त केले. स्थानिक हॉटेल इव्हेंन्टो मध्ये ३ एप्रिल रोजी आयोजित व्हॉईस ऑफ मीडियाच्या कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल मस्के यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. दिपक शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले पाटील, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, रिसोड पंचायत समितीच्या माजी सभापती सुशिलाताई शिंदे, दिव्या देशमुख आदिंची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा व व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतील पदाधिकाºयांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना अनिल मस्के म्हणाले, कोरोना महामारीत सर्वाधिक नुकसान पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचे झाले. या काळात अनेकांचे रोजगार हिरावल्याने पत्रकारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ ओढवली. समाजातील वंचित घटकाला न्याय देवून त्यांचे दु :खात सहभागी होणाºया पत्रकारांची अवस्था शासनाकडूनच नव्हे तर समाजाकडूनही उपेक्षिल्या गेल्याची बाब जेष्ठ पत्रकार संदीप काळे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पत्रकार व त्याच्या कुटुंबियांचे आजचे पर्यायाने उद्याचे भविष्य घडविण्याचा विडा उचलण्याचा त्यांनी निर्धार केला. यानंतर समविचारी मित्रांच्या पुढाकारातून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकारांच्या न्यायासाठी लढणाºया संघटनेचा जन्म झाल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने पाऊले उचलल्या जात आहेत. यासाठी कामांची आखणी करुन त्याचा पाठपुरावा केल्या जात असल्याने कमी कालावधीत कृतिशिल संघटना अशी संघटनेची ओळख झाल्याचे त्यांनी सांगीतले़श. प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी संघटनेची कार्याची माहिती देताना संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाºयांच्या नेमणुका करण्यासोबतच त्यांना प्रदान करण्यात आलेल्या विमा सुरक्षा कवच असो वा इतर नियोजीत कार्यक्रमाविषीयची माहिती याप्रसंगी दिली. दरम्यान, कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पदाधिकाºयांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिकाºयांना मान्यवरांच्या हस्ते
नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटनेचे जिल्हा प्रवक्ता देव इंगोले यांनी तर आभार उपाध्यक्ष आकाश पाटील शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी सहकुटुंब उपस्थित होते.
चौकट
पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडणार : दिव्या भोसले
कोरोना महामारी व त्यानंतरच्या काळात पत्रकारांच्या कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख पाहवले गेले नसल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’चा जन्म झाला. अवघ्या दिडवर्षात या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रुपांतर झाले असून पत्रकार कल्याणासाठी विविध शाखा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांचे कुटुंबियांच्या आरोग्य, शिक्षण व निवारा या मुलभूत गरजांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. संघटना पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवूण देण्यासाठी बांधील असल्याचे मत संघटनेच्या कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी पत्रकार संवाद साधून संघटना पत्रकारांच्या कुटुंबियांसोबत असल्याचा विश्वास दिला.
0 Response to "पत्रकार कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची गरज अनिल मस्के यांचे प्रतिपादन ; व्हॉईस ऑफ मीडियाचा कुटुंब स्नेहमिलन सोहळा"
Post a Comment