
सामजिक न्याय पर्व लाभार्थ्यांना होणार प्रतिनिधीक स्वरूपात साहित्याचे वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
सामजिक न्याय पर्व
लाभार्थ्यांना होणार प्रतिनिधीक स्वरूपात साहित्याचे वितरण
वाशिम, सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने ५ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,मिनी ट्रॅक्टर लाभार्थी व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण लाभार्थ्यांना आयोजित कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित नागरिक व लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती सुध्दा देण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
0 Response to "सामजिक न्याय पर्व लाभार्थ्यांना होणार प्रतिनिधीक स्वरूपात साहित्याचे वितरण"
Post a Comment