-->

जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून 'स्वच्छ माझे अंगण' अभियान  घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे सीईओंचे आवाहन

जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून 'स्वच्छ माझे अंगण' अभियान घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे सीईओंचे आवाहन



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून 'स्वच्छ माझे अंगण' अभियान

घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे सीईओंचे आवाहन


वाशिम, दि. ३१: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत 'स्वच्छ माझे अंगण' हे महत्त्वपूर्ण अभियान वाशिम जिल्ह्यात दि. १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त (ओडीएफ) मॉडेल गावे तयार करणे आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

वैभव वाघमारे यांनी दिली आहे. वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी अंमलबजावणी हा या अभियानाचा उद्देश आहे, जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील सर्व गावांचे नियोजन करून नागरिकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांच्या माध्यमातूनअभियानाची

माहिती ग्रामस्थांना

देण्यात येणार

आहे. अभियानात सहभागी झालेल्या कुटुंबांचा यशोचित सत्कार करण्यात येईल. सहभागी कुटुंबांनी घरगुती खतखडा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा किवा पाझरखड्डा, वैयक्तिक शौचालय आणि घरगुती कचराकुंड्या ठेवणे आवश्यक आहे. अशा कुटुंबांना दि. २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित

केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे,   जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश साहू यांनी गावकऱ्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


अभियान कालावधीचे टप्पे:


अभियान कालावधी : १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२४


पडताळणी कालावधी: २६ ते ३० सप्टेंबर २०२४

- पात्र कुटुंबांना निमंत्रण: १ ऑक्टोबर २०२४

- प्रशस्तीपत्र वितरण

: २ ऑक्टोबर २०२४

0 Response to "जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून 'स्वच्छ माझे अंगण' अभियान घरगुती स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे सीईओंचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article