अवयव दान चळवळी संदर्भात बैठक देहदान अवयव दान
साप्ताहिक सागर आदित्य
अवयव दान चळवळी संदर्भात बैठक
देहदान अवयव दान
चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाशीम जिल्हा सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये फेडरेशन ऑफ बॉडी अड ऑर्गन डोनेशन महाराष्ट्र राज्य तसेच गीताई ह्युमनकाईड ट्रस्ट, पुणे तसेच वाशीम येथील विचारवंतांनी दखल घेऊन हि चळवळ तळागाळा पर्यंत पोहचविण्यासाठी मान्यवरांचे संघटन तयार केले असून अनेक वृत्तपत्रानेही दखल घेतली आहे.
अधिवेशन घेण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या सभेमध्ये नियोजन
आणि प्रयोजन करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. जिल्हा अधिकारी यांनी तत्वताच मान्यता दिली. यामध्ये विविध सेवाभावी संस्था डॉक्टर, समाज सेवक यांनी सुध्दा सक्रीय सहभाग दर्शविला याकरीता लवकरच पुढील बैठक घेण्यात येईल असे ठरले. सदर
बैठकीस जिल्हाधिकारी भुवनेश्वरा, समाज सेवक जनार्दन मगर, समाज सेवक अध्यक्ष कृषी महाविद्यालय आमखेडाचे माणिकराव जोगदंड, समाजसेवक वसंतराव धाडवे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोशी आदिंची उपस्थिती होती.
0 Response to "अवयव दान चळवळी संदर्भात बैठक देहदान अवयव दान"
Post a Comment