-->

दिव्यांग कल्याण विभाग  दिव्यांगाच्या दारी :   जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी : जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

दिव्यांग कल्याण विभाग

दिव्यांगाच्या दारी : 

जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा


वाशिम, दिव्यांग नागरिकांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक दिव्यांग विभागीयस्तरावर जाऊन आपली तक्रार नोंदवु शकत नाहीत. त्यामुळे शासनाने दिव्यांगांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली, तर त्यांच्यासाठी महत्वाचे ठरेल त्यामुळे जर शासनच अशा दिव्यांग बांधवांच्या दारी गेले तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांची सेवा होवु शकते हा हेतु ठेवुन, जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकिय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहुन दिव्यांगाच्या तक्रारी जाणुन घेवून त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल.याकरीता दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

         दिव्यांगांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच शासकिय योजनांचा फायदा घेण्यास आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो.दिव्यांगाना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे जसे की,दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र,शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे,जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.याच अनुषंगाने हे शिबीर ४ ऑक्टोबर रोजी तिरुपती लॉन, शासकिय तंत्रनिकेतन समोर,रिसोड रोड वाशिम येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीराकरीता जिल्ह्यातील एकुण ३५ शासकीय यंत्रणेचा सहभाग आहे.दिव्यांगांना सेवा देण्याकरीता विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहे.हे शिबीर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे.जिल्हयातील सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.

0 Response to "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी : जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article