-->

खरोळा गावात उप मुख्य कार्यकारी अधिकारी  दिगंबर लोखंडे यांच्यासह गावकर्‍यांनी केली स्वच्छता!

खरोळा गावात उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह गावकर्‍यांनी केली स्वच्छता!



साप्ताहिक सागर आदित्य 

स्वच्छता ही सेवा:जिल्ह्यातील ६७५ गावात श्रमदान!

खरोळा गावात उप मुख्य कार्यकारी अधिकारी  दिगंबर लोखंडे यांच्यासह गावकर्‍यांनी केली स्वच्छता! 

वाशिम दि. १ आॅक्टोबर,


स्वच्छता ही सेवा या अभिनव मोहीमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ६७५ गावांमध्ये स्वच्छतेबाबत सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रमदान करण्यात आले.

वाशिम तालुक्यातील खरोळा गावात जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्यासह गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी श्रमदान करून गावाचा परिसर स्वच्छ केला.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभागाने शनिवारी (दि. ३०) चोख नियोजन केले. जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी श्रमदान करण्याबाबत गावपातळीवरील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. रविवारी ग्रामीण भागात सकाळपासूनच स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व (६७५) गावात सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी श्रमदान  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काही ठिकाणी स्वच्छता रॅली काढुन जनजागृती करण्यात आली. यामध्ये शाळकरी मुलांचाही सहभागही घेण्यात आला.


जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दहा वाजता, एक तासाच्या स्वच्छता महाश्रमदानात  जिल्हा परिषदेचे  उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, वाशिम पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद लोखंडे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ राम श्रृंगारे यांनी खरोळा या गावात सहभाग घेतला. यावेळी गाडगेबाबांच्या वेषात पी. एस. खंदारे यांनी स्वच्छतेबाबत किर्तन सादर करुन उपस्थिंना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले. शाळेतील मुलांनी गावातुन स्वच्छता फेरी काढली.

या दरम्यान गावातून कचरा संकलीत करण्यात आला. शाळा, चौक व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

यावेळी गावच्या सरपंच सोनाली ठाकरे, पंचायत समिती सदस्य दीपक खडसे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास ठाकरे  सुधीरभाऊ वारकड, निळकंठ ठाकरे, महादेव निकम, रामचंद्र खडसे, सिद्धार्थ खडसे, माणिक ठाकरे, गजानन ठोंबे, प्रयागबाई खडसे, सुनीता खडसे, शिल्पाताई खडसे, नंदू ठाकरे, बबन ठाकरे, संतोष सोनवणे, विनोद वारकड, शाळेचे मुख्याध्यापक ग. का. राऊत, पांडुरंग महाले, श्रीकांत बोरचाटे, पिंटू ठाकरे, सौ गंगासागर महाले, ग्रामसेविका श्रीमती ठाकरे, तेजस्विनी खडसे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींची उपस्थिती होती.

0 Response to "खरोळा गावात उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह गावकर्‍यांनी केली स्वच्छता! "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article