-->

शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध

                       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न


वाशिम , शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाची व्याप्ती व विविध स्तरावर नियोजन करून  जिल्हा आत्महत्या मुक्त व बालविवाह मुक्त करण्यासाठी शेतकरी आत्मबल कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आत्महत्या थांबविण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले. आज १७ मे २०२४ रोजी नियोजन भवन वाशिम येथे शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रम अंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

  कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी श्री खुळे , वाशिम तालुका कृषी अधिकारी  अतुल जावळे,  कायदा तथा परिविक्षा अधिकारी  जीनसाजी चौधरी ,जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मनोविकार तज्ञ  डॉ.श्वेता मोरवाल (ठाकूर), जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर यांची  उपस्थिती होती. 

      श्रीमती देवकर यांनी सर्व ग्रामस्तरीय समित्यांचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करून सदर कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याविषयी मार्गदर्शन केले. आत्मबल उन्नती कार्यक्रमाबाबत जागृत राहून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन केले. तर प्रमुख मार्गदर्शक जीनसाजी चौधरी  यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले.  डॉ. श्वेता मोरवाल  यांनी मानसिक आरोग्य आणि शेतकरी मानसशास्त्र विषयी विस्तृत माहिती दिली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मानवीय लक्षणे व मानसिक आरोग्य राखण्यासाठी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती सीमा खिरोडकर यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. अतुल जावळे  यांनी बहुपीक पद्धती आणि आंतर पिकाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करताना  सोयाबीन एकलपिक घेत असलेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याविषयी आवाहन केले. शेती सोबतच शेती निगडित प्रक्रिया उद्योग उभारणे तसेच शेतकऱ्यांना शाश्वत अर्थार्जण हवे तर शेत निगडित विविध व्यवसाय जसे की रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन करण्यासंबंधात आवाहन केले. 

         कृषी सहाय्यक महादेव सोळंके यांनी सोयाबीन अष्टसूत्री व शेतीचा कमी खर्च करण्याकरिता विविध उपाय योजना विषय मार्गदर्शन करताना नैसर्गिक शेतीचे महत्व  सांगितले . यावेळी पंकज महाले या शेतकऱ्याने सेंद्रिय व नैसर्गिक शेती केल्याने खर्चात बचत व जमिनीच्या आरोग्य सुधारणा बाबत  अनुभव कथन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू  भगत यांनी शेतकरी आत्मबल वाढविण्याबाबत जनजागृती विषयी मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमास वाशिम तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी उत्पादक गट प्रतिनिधी शेतकरी , महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी ,ग्रामविकास विभाग सर्व अधिकारी कर्मचारी, विस्तार अधिकारी ,ग्रामसेवक, आरोग्य सेवक ,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,पोलीस पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदारचे डीलर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार निलेश पळसकर यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी व्यक्त केले.

0 Response to "शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाअंतर्गत वाशिम तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article