
सहा तास अभ्यास करून जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली अनोखी आदरांजली
साप्ताहिक सागर आदित्य
सहा तास अभ्यास करून जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली अनोखी आदरांजली
वाशिम_ श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम च्या वतीने युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांना एक वेगळी आदरांजली दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विद्यार्थी हा निश्चितच अभ्यासू चिंतनशील असा असावा हा बाबासाहेबांचा प्रेरणादायी विचार घेऊन विद्यार्थ्यांनी सहा तास निरंतर अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत असा विद्यार्थी घडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. व यातूनच अभ्यास चिंतन याचीच आदरांजली दिली. या आदरांजली खरी आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे म्हणूनच मराठी विभागाच्या प्रा. सुनीता अवचार यांनी याचे आयोजन केले मराठी विभागाकडून सहा तास अभ्यासाचे नियोजन दिनांक ६/१२/२२ ला केलं गेलं होतं . महाविद्यालयातील एकूण एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहा तास अभ्यास करून एक वेगळी अनोखी आदरांजली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिली यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची पुस्तके वाचले काही चरित्रे ,कादंबऱ्या ,कवितासंग्रह, अभ्यासाचे पुस्तके इत्यादींचे वाचन या 50 विद्यार्थ्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म ,मिलिंद प्रश्न ,शिवाजी महाराजांचे चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित अनेक पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले महापुरुषांच्या विचारांचे पठण केले. ६ डिसेंबरला केले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले ते महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. पद्मानंद तायडे यांनी या अभ्यासिकेमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख इंग्रजी प्रा.रिंकू रुके यादेखील अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सहा तास अभ्यास केला . मराठी विभागाच्या प्राध्यापिका सुनीता अवचार यांनी देखील सहा तास अभ्यास विद्यार्थ्यासोबत केला . या कार्यक्रमासाठी सचिन नवघरे गायत्री कव्हर, रूपाली वाणी, तेजस्विनी काळे ,दत्ता ढाले, अविनाश चव्हाण, इत्यादी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Response to "सहा तास अभ्यास करून जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली अनोखी आदरांजली"
Post a Comment