
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक अधिकार दिले..! डॉ. लता जावळे
साप्ताहिक सागर आदित्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक अधिकार दिले..! डॉ. लता जावळे
वाशिम_ श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम मराठी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पद्मानंद तायडे यांनी अध्यक्षस्थानी होते . या कार्यक्रमासाठी समीक्षिका व साहित्यिक डॉ. लता जावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली स्त्री याविषयी बोलताना डॉ.लता जावळे म्हणाल्या की समान संधी समान न्याय समान स्वातंत्र्य मतदानाचा अधिकार मातृत्वाला सन्मान असे घटनात्मकरीत्या बाबासाहेबांनी स्त्रियांना अधिकार दिले . बुद्ध फुले शाहू यांना अभिप्रेत असलेली स्त्री हा विचारांचा वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला घटनात्मकरीत्या पूर्णत्वास नेले. असे ते आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणाल्या. अध्यक्षही भाषणामध्ये बाबासाहेबांनी दलितोत्तर बाबासाहेब यांचे कार्य प्रभारी प्राचार्य डॉ. परमानंद तायडे यांनी याविषयी आढावा आपल्या भाषणामध्ये घेतला की बाबासाहेबांनी कोणी एका जातीसाठी काम केले नाही तर समस्त बहुजन आणि माणसासाठी केले आहे. त्यामुळे त्यांचा विचारांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असेही ते याप्रसंगी आपल्या भाषणात म्हणाले . या कार्यक्रमाच्या मध्ये प्रमुख उपस्थिती प्रा. रिंकू रूक्के यांची देखील होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रा. सुनीता अवचार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वीनी काळे या विद्यार्थ्यांनी अतिशय सूत्रबद्धपणे आपले सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी अविनाश चव्हाण, राहुल लांडगे,हर्षा उखळकर, रूपाली वाणी,अंजली देवकते, दत्ता ढाले, राणी मालस इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राणी वानखेडे या विद्यार्थिनींनी केले अशा या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
0 Response to " डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक अधिकार दिले..! डॉ. लता जावळे"
Post a Comment