-->

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय , आमखेडा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय , आमखेडा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय , आमखेडा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी दि . ०६/१२/२०२२ कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय , आमखेडा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १ ९ ५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण ( निधन ) झाले होते , याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले . निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १ ९ ५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता , त्यांना बौद्ध लोक ' बोधिसत्त्व ' मानतात . कार्यक्रमाची सुरुवात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . एम . जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्दितीय वर्षाचा विद्यार्थी अविनाश कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित तायडे यांनी केले . प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु . कोमल जोगदंड आणि विदयार्थी कृष्णा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय भाषण डॉ . एस . एम . जाधव यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैभव डोरशेद्वार या विद्यार्थ्यांने केले . आजच्या कार्यक्रमासाठी मा . अविनाशजी जोगदंड आणि प्रा . अजिंक्य पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळेस कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . एम . जाधव , डॉ . आर . एस . करंगामी ( रा . से . यो . , कार्यक्रम अधिकारी , प्रा . पि . टी . नीचल , प्रा . एस . बी . वाकुडकर , प्रा . एम . पी . सुरुशे व ईतर प्राध्यापक वृंद , कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Related Posts

0 Response to "कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय , आमखेडा येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article